आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS च्या नव्या व्हिडिओमध्ये भारतीय तरुण, सोशल साइटवर पोस्ट केले फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ISIS च्या एका समर्थकाने सोशल साइटवर पोस्ट केले फोटो. - Divya Marathi
ISIS च्या एका समर्थकाने सोशल साइटवर पोस्ट केले फोटो.
बेरूत - इस्लामिक स्टेटच्या समर्थकांनी सोशल मीडिया अकाऊंटवर सोमवारी काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यामध्ये दोन बोटमध्ये काही दहशतवादी दिसत आहेत. यापैकी बहुतांश भारतीय तरुण असल्याचे सांगण्यात येत आहे. हे फोटो ISIS ची मीडिया विंग असलेल्या 'अल हयात'ने जारी केलेल्या नव्या व्हिडिओतून घेण्यात आले आहेत.

ISIS चा दावा
ISIS ने केलेल्या दाव्यानुसार या बोटवर असणारे दहशतवादी हे भारतीय आहेत. त्यांच्यापैकी एक दहशतवादी अबु तुरब अल हिंदी आहे. तो इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या होता. गेल्यावर्षी त्याचा सिरियामध्ये मृत्यू झाला आहे.

@cihadci2 च्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, कोणी ओळखले का? अल हयात मीडियाच्या लेटेस्ट व्हिडिओमध्ये भारतीय तरुणांनी भरलेल्या बोट्स दिसत आहेत. हे ट्विट सोमवारी दुपारी 12.27 वाजता करण्यात आले होते.

शेअर करण्यात आलेलया या फोटोत समुद्रात दोन बोटवर अनेक दहशतवादी दिसत आहेत. त्यांच्या हातात, असॉल्ट रायफल्स आणि इस्लामिक स्टेटचा झेंडा आहे. या फोटोखाली असा मजकूर लिहिला आहे की, यांनी आपले सर्वस्व अल्लाहला अर्पण केले.

दुसऱ्या एका ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, यापैकी एक इंडियन मुजाहीदीनचा पूर्वीचा ग्रुप लीडर आहे. तो कोबानी मध्ये शहीद झाला होता. त्याचे नाव अबु तुराब अल हिंदी.

जोपर्यंत सर्व भारतीय आमच्यासोबत येत नाहीत, तोपर्यंत ही बोट थांबूच नये. आम्ही तुम्हा सर्वांना आमंत्रित करतो, असे आणखी एका ट्विटमध्ये आहे.

ISIS समर्थकाच्या एका अकाऊंटवरून व्हिडिओचा एक फोटोही शेअर करण्यात आला आहे. त्यात एक जण एक बोट उंचावून काही तरी सांगत आहे. त्याखाली लिहिले आहे, अबु काका अल हिंदी, भारतातील एक मुजाहिद्दीन.

भारताच्या फहाद शेखचे असू शकते ट्विटर अकाऊंट
हे ट्विटर अकाऊंट ठाण्याच्या फहाद शेखचे असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तो गेल्यावर्षी ISIS मध्ये सहभागी होण्यासाठी गेला होता. फहाद यापूर्वी @magnetga अकाऊंट वापरत होता. 21 वेळा ते सस्पेंड करण्यात आले आहे. त्यानंतर त्याने @pneumatic11, @tungsten9, @cihadci आणि @helium61 हे हँडलर वापरले. तेही सस्पेंड करण्यात आले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, व्हि़डिओवरून घेतलेले PHOTOS
बातम्या आणखी आहेत...