आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IS ची व्हिडिओतून धमकी: बांगलादेशात काफिरांचे सरकार, पुन्हा करणार हल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बांगलादेशात पुन्हा हल्ला करण्याची धमकी देणारा व्हिडिओ समोर आला आहे. - Divya Marathi
बांगलादेशात पुन्हा हल्ला करण्याची धमकी देणारा व्हिडिओ समोर आला आहे.
ढाका (बांगलादेश) - दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने बांगलादेशात पुन्हा हल्ला करण्याची धमकी दिली आहे. आयएसच्या एका एजन्सीने रक्का येथून एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यात बांगलादेशातील शेख हसीना सरकार काफिरांचे सरकार असल्याचे म्हटले आहे. बंगाली भाषेतील या व्हिडिओमध्ये दिसणारे तीन जण हे बांगलादेशी आहेत. त्यांची ओळख अजून पटलेली नाही. या प्रकरणी बांगलादेशाने अजून काहीही अधिकृत वक्तव्य केलेली नाही.
दहशतवादी म्हणाले गमावण्यासारखे आमच्याकडे काहीही नाही
- आयएसच्या एका एजन्सीने आज (बुधवार) हा व्हिडिओ रिलीज केला आहे. त्यात आयएसने मुजाहिदांवर (जे मुस्लिमांच्या विरोधात लढत आहे) आणि मुजाहिद देशांवर हल्ल्याची धमकी दिली आहे.
- व्हिडिओमध्ये एक जण म्हणतो, 'जोपर्यंत आम्ही जिंकत नाही किंवा धर्मासाठी लढताना मरत नाही तोपर्यंत आम्ही मुजाहिदांची हत्या करणे बंद करणार नाही.'
- 'आम्ही जीव देण्यास तयार आहोत, कारण आमच्याकडे गमावण्यासारखे दुसरे काही नाही.'
- व्हिडिओतील दुसऱ्या एका व्यक्तीने बांगलादेश सरकारला काफिर म्हटले. तो म्हणाला, 'सरकारने अल्लाचा कायदा बदलून मानवी कायदा लागू केला आहे. आता ते काफिर आहेत.'
- 'आमच्या धर्मानुसार यांच्याविरोधात लढणे हे आमचे कर्तव्य आहे. मुजाहिद बॉम्बस्फोट घडवून जगभरात निष्पाप मुस्लिमांचा जीव घेत आहेत.'
- तिसऱ्या व्यक्तीने मुस्लिमांनी जिहादसाठी आयएस जॉइन करण्याचे आवाहन केले. तो म्हणाला, ''इंशा अल्लाह, अल्ला आमचा जिहाद कबूल करेल.''
पुढील स्लाइडमध्ये, भारतीय वंशाच्या तारिषीची बांगलादेशात हत्या...
बातम्या आणखी आहेत...