आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AK-47 ने भरलेली कार मिळाली, रक्‍ताने माखलेल्‍या हॉलचे फोटो समोर आले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिसमधील बताक्लां कॉन्सर्ट हॉलमध्‍ये दहशतवाद्यांनी 100 पेक्षा अधिक व्‍यक्‍तींची हत्‍या केली. - Divya Marathi
पॅरिसमधील बताक्लां कॉन्सर्ट हॉलमध्‍ये दहशतवाद्यांनी 100 पेक्षा अधिक व्‍यक्‍तींची हत्‍या केली.
पॅरिस- फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये शुक्रवार शनिवारदरम्‍यान 'इसिस' या दहशतवादी संघटनेने मोठा हल्ला केला. यात हॉटेल,बार तसेच कॉन्सर्ट हॉलजवळ हा हल्ला केला तर फुटबॉल मॅच सुरु असताना स्टेडियमबाहेरदेखील स्फोट झाला. या हल्ल्यात शेकडो व्‍यक्‍ती ठार झाल्‍या.

जॉर्ज पॉम्पिडो रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख फिलिप ज्युविन यांना हल्ल्याची माहिती मिळताच त्यांनी सर्वात आधी आपल्या वैद्यकीय पथकाला बोलावले. पण घाईत त्यांना सर्वांना कॉल करता आला नाही. पाहतात तर काय, सर्व जण पोहोचले होते. फिलिप यांनी सांगितले, ‘ब्रिटनचे काही डॉक्टर सुटीसाठी पॅरिसमध्ये आले होते. तेही धावतच रुग्णालयात आले आणि मदत सुरू केली.

अतिरेकी हल्ला झाल्यास रुग्णालयात कसे काम करायचे याचा सराव आम्ही त्या दिवशीच सकाळी केला होता. त्याचा खूप फायदा झाला. आमच्या पथकातील सर्वांनी योग्य पद्धतीने काम केले. त्यामुळे आम्ही रुग्णालयात आलेल्या सर्व 50 जखमींचे प्राण वाचवू शकलो.

गोळीबार सुरू असतानाच वेटरने जखमींना बाहेर काढले
सेफर कासा नोस्ट्रा रेस्तराँच्या बारमध्ये होते. ते ग्राहकांना सर्व्ह करत असतानाच सर्वांच्या ओरडण्याचा मोठा आवाज ऐकू आला. काचा फुटायला लागल्या. त्यांच्या चेहऱ्यालाही काच लागली. त्याच वेळी सेफर यांना छतावर 2 जखमी महिला दिसल्या. त्यांच्या खांद्याला गोळी लागल्याने रक्त वाहत होते. गोळीबार सुरू असतानाच सेफर त्या महिलांजवळ गेले. त्यांना घेऊन बेसमेंटमध्ये आले. प्राथमिक उपचार केले. तोपर्यंत बचाव पथकाचे सदस्य पोहोचले होते.
एका गार्डच्या सतर्कतेमुळे बचावले स्टेडियम
तीन अतिरेकी नॅशनल स्टेडियममध्ये घुसू इच्छित होते. त्यांच्याकडे सामन्याची तिकिटेही होती. पण, सुरक्षा रक्षकाला संशय आला. त्याने तपासणी सुरू करताच एका अतिरेक्याने पळ काढला व स्वत:ला उडवले. काही वेळानंतर दुसऱ्यानेही तसेच केले. तिसऱ्याने धूम ठोकून एका हॉटेलजवळ स्वत:ला उडवले. गार्डमुळे अतिरेकी आत जाऊ शकले नाहीत. आत अध्यक्षांसह 80 हजार लोक होते.
फ्रान्समधील हल्ल्यांची चौकशी सुरू झाली असून, चार अतिरेक्यांची ओळख पटली आहे. एके-47 ने भरलेली कार जप्त झाली आहे. पण, धैर्य दाखवून अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या हिरोंचीच कहाणी सर्वांच्या तोंडी आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...