आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IS चा MAP आला समोर, इसिसचा भारतीय उपखंडावर २०२० पर्यंत कब्जाचा कट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इसिसने प्रसिद्ध केलेल्या नकाशात भारतीय उपमहाद्विपाला 'खुरासान' म्हटले आहे - Divya Marathi
इसिसने प्रसिद्ध केलेल्या नकाशात भारतीय उपमहाद्विपाला 'खुरासान' म्हटले आहे
लंडन - इस्लामिक स्टेट अर्थात इसिस या अतिरेकी संघटनेला येत्या पाच वर्षांत म्हणजेच २०२० पर्यंत संपूर्ण भारतीय उपखंडासह जगाच्या मोठ्या भूभागावर कब्जा करून आपली स्वत:ची खिलाफत स्थापन करायची आहे. या घातक अतिरेकी संघटनेवर लिहिण्यात आलेल्या एका पुस्तकातील नकाशामुळे हा धक्कादायक कट उघडकीस आला आहे.

या नकाशानुसार इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरियाला (इसिस) आपली ‘खिलाफत’ पूर्णत्वास नेण्यासाठी पुढील पाच वर्षांमध्ये जगाच्या मध्यपूर्वेतील देश, उत्तर आफ्रिका, संपूर्ण भारतीय उपखंड आणि युरोपच्या काही भागावर कब्जा मिळवायचा आहे. बीबीसीचे पत्रकार अँड्र्यू होस्कन यांनी त्यांच्या ‘एम्पायर ऑफ फिअर : इनसाइड इस्लामिक स्टेट’ (दहशतीचे साम्राज्य : इस्लामिक स्टेटच्या अंतरंगात) या नव्या पुस्तकात हा नकाशा दिला आहे. इस्लामी जग म्हणून इसिस जगाच्या ज्या भागाकडे पाहते, त्या सर्व भागावर कब्जा करण्याची त्यांची योजना आहे, असे अँड्र्यू यांनी म्हटले आहे. इसिसने २० वर्षांपूर्वी सातकलमी योजना आखली आहे. त्यात २००० आणि २००३ मध्ये अमेरिकेने इस्लामी जगताविरुद्ध युद्धाची चिथावणी दिल्याचा आणि २०१० आणि २०१३ मध्ये अरब राजवटींविरुद्ध विद्रोहाला खतपाणी घालण्यात आल्याचाही समावेश आहे. इसिसला कब्जा करायचा आहे.
स्पेनपासून चीनपर्यंत इसिसची खिलाफत
खिलाफत हे शरिया कायद्यानुसार चालवले जाणारे राष्ट्र असेल, असा इसिसचा दावा असून इसिसच्या या खिलाफतमध्ये पश्चिमेतील स्पेनपासून पूर्वेतील चीनचाही समावेश आहे. २०२० पर्यंत हा संपूर्ण भाग आपल्या नियंत्रणाखाली आणण्याची इसिसची योजना आहे.

भारतीय उपखंडाचे नाव ‘खुरसान’
इसिसच्या या संभाव्य खिलाफतमध्ये भारतीय उपखंडाला ‘खुरसान’ असे अरबी नाव देण्यात आले आहे, तर स्पेन, पोर्तुगाल आणि फ्रान्सला अंदालूस हे अरबी नाव देण्यात आले आहे. ८ व्या ते १५ व्या शतकात मूर्स नावाच्या मघरेबच्या मुस्लिम शासकांनी या भागांवर कब्जा केला होता.
इसिसच्या फौजेत ५०,००० सैनिक
इसिसच्या फौजेमध्ये ५० हजारांहून अधिक सैनिक आहेत आणि इराक व सिरियातील तेलक्षेत्रावर कब्जा असल्यामुळे सुमारे २ अब्ज पाउंड्सची मालमत्ता आहे.
जगातील ६० देश विरोधात कारवाया
अमेरिका आणि रशियासह जगातील ६० देश इसिसच्या विरोधात आहेत. त्यामुळे इसिसची ही योजना दिवास्वप्न वाटत असले तरीही त्या दिशेने त्यांनी पहिले पाऊल टाकले आहे, हेही लक्षात घेण्यासारखे आहे.
म्हणे २०२० पर्यंत विजय मिळवणार
अबू मुसाब अल झरकवीने १९९६ मध्ये स्थापन केलेली अतिरेकी संघटनाच नंतर आयएसआयएस नावाने ओळखली जाऊ लागली. इसिसचा सातकलमी कार्यक्रम २०२० पर्यंत मुस्लिमांना जगावर विजय मिळवून देईल.
बातम्या आणखी आहेत...