आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ISIS च्या क्रूरतेचा व्हिडिओ, गुप्तहेर असल्याचा आरोप करुन केला सीरियन नागरिकाचा शिरच्छेद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेरुत(लेबनॉन) - दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटची(आयएसआयएस) क्रूरतेचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. यात एक ओलिस स्वत:ला दफन करण्‍यासाठी खड्डा खोदताना दिसत आहे. नंतर त्याचा शिरच्‍छेद करुन हत्या करण्‍यात येते आणि त्याला त्याच्या खड्डात पुरण्‍यात येते.व्हिडिओत सांगण्‍यात आले, की ओलिस व्यक्ति सीरियन सरकारचा गुप्तहेर आहे. त्याचे नाव जियाद अब्देल अल अबु तारेक असे सांगण्‍यात आले आहे. नारंगी रंगाचा जंपसूट परिधान करणारा या व्यक्तिला खड्डा खोदताना व्हिडीओत दिसत आहे. अमेरिकन पत्रकार फोले व इतर ओल‍िसांची हत्याचे व्हिडिओप्रमाणे व्यावस‍ायिक पध्‍दतीने चित्रित करण्‍यात आले आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला गुप्तहेर आपल्या गुन्ह्यांची कबूली देतो. त्याच्या चेह-यावर जखमांचे खूणा आहेत. तो स्वत:ला मध्‍य सीरियातील अल-करयातान या शहरातील रहिवाशी सांगतो. तो म्हणतो, की गुप्तहेर आहे. मी अबू हसनची हत्या केली असून नंतर मला इस्लामिक स्टेटने पकडले. दरम्यान त्याच्या मागे पांढरे ट्रक दिसतात. त्यावर इस्लामिक स्टेटचे झेंडा लावला आहे.
तिकर‍ितमध्‍ये दफनभूमीत म‍िळाले 470 मृतदेह
इराकच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले, की तिकरितच्या जवळ एका दफनभूमीत 470 मृतदेह मिळाले आहे. आधिका-यांच्या माहितीनुसार हे शव जून 2014 मध्‍ये इस्लामिक स्टेटने मारलेली लोक असू शकतात. 12 जून 2014 मध्‍ये स्टेटने 1 हजार 566 लोकांची हत्या केली होती. मानवाधिकार संघटनांनी या नरसंहाराची छायाचित्रे प्रिसिध्‍द केली होती. मृतदेहांची ओळख पटल्यानंतर त्यांच्या नावांची यादी तयार करण्‍यात येईल, असे अधिका-यांनी सांगितले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सीरिया ओल‍िसाशी संब‍ंधित फोटोज...