आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ISIS Reached In Bangladesh Killed One Italian Citizen

भारताच्या आणखी जवळ ISIS? बांगलादेशात इटालियन व्यक्तीची हत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉस्पिटलमध्ये इटालियन नागरिकाच्या मृतदेहाचे फोटो घेणारे पत्रकार. - Divya Marathi
हॉस्पिटलमध्ये इटालियन नागरिकाच्या मृतदेहाचे फोटो घेणारे पत्रकार.
ढाका - बांगलादेशची राजधानी ढाका येथील डिप्लोमॅटिक क्वार्टर एरियामध्ये एका इटालियन नागरिकाची गोळी मारून हत्या केल्याची जबाबदारी ISIS ने स्वीकारली आहे. दहशतवादी कारवायांवर नजर ठेवणारी संघटना इंटेलिजंस मॉनिटरिंग ग्रुप SITE ने हा दावा केला आहे. त्यानुसार इस्लामिक स्टेटने सोमवारी एका ऑनलाइन स्टेटमेंटमध्ये ही जबाबदारी स्वीकारली. ISIS द्वारे बांग्लादेशात कारवाईचा हा पहिलाच प्रकार आहे.

पोलिसांचे मौन
या प्रकरणी इटलीच्या दुतावासाकडून अद्याप काहीही अधिकृतरित्या सांगण्यात आलेले नाही. तर ढाकामध्ये पोलिसांनीही या प्रकरणावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. पोलिस अधिकारी मुखलेसर रेहमान म्हणाले की, अजून तपास सुरू झाला नाही, त्यामुळे लगेच काही सांगता येणार नाही.

अमेरिकन आणि ब्रिटिश दुतावासाचा अलर्ट
बांगलादेशमधील अमेरिका आणि ब्रिटनच्या दुतावासांनी त्यांचे नागरिक आणि राजदूत यांचा सतर्क राहण्याच्या सूचना देत हाय अलर्ट दिला आहे. दोन्ही देशांच्या गुप्तचर संस्थांना दहशतवादी पाश्चिमात्य देशांच्या नागरिकांना लक्ष्य करू शकतात अशी माहिती मिळाली आहे.

प्रकरण काय...
मीडिया रिपोर्ट्सनुसार सोमवारी रात्री 58 वर्षांच्या सेसारे टवेला यांची तीन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. ते डिप्लोमॅटिक क्वार्टर परिसरात जॉगिंग करत असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्यक्षदर्शींनी तीन गोळ्यांचा आवाज ऐकला. टवेला गोळी लागल्यानंतर खाली कोसळले तेव्हा हल्लेखोर फरार झाले. त्यानंतर टवेलांना रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टारांनी त्यांना मृत घोषित केले होते.