आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS चा नवीन व्हिडिओ: काहींवर सोडले रॉकेट, काहींच्‍या गळ्याला तोफ बांधून घडवले स्‍फोट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सना - दहशतवादी संघटन आयएसआयएस (इस्लामिक स्टेट) ने एक नवीन व्‍हिडिओ प्रसारित केला आहे. या व्‍हिडिओमध्‍ये दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्‍या 25 जणांना वेगवेगळ्या अत्‍यंत क्रुर पद्धतीने मारले आहे. काहींना रॉकेट लॉंचरने तर चार जणांच्‍या गळ्याला तोफा बांधून स्‍फोट केल्‍याचे या व्‍हिडिओमध्‍ये आहे.
व्‍हिडिओमध्‍ये काय आहे ?
- 15 मिनीट 23 सेकंदाच्‍या या व्‍हिडिओमधुन घेतलेल्‍या फोटोंमध्‍ये स्‍पष्‍ट दिसत आहे की, दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्‍यांच्‍या गळ्यात तोफ बांधुन त्‍याचा स्‍फोट केला.
- मात्र, येमेनमध्ये कोणत्‍या ठिकाणी हा प्रकार घडला हे समजू शकले नाही.
- या व्‍हिडिओची सुरूवात येमेनमधील लढाईने होते.
- त्‍यानंतर फुटेजमध्‍ये सुनसान परिसरात नारंगी कपड्यात चार जण दिसत आहेत. त्‍यांच्‍या गळ्यात स्‍फोटकं लटकवलेले दिसतात.

वेगवेगळ्या प्रकारे हत्‍या
- अपहरण केलेल्‍या दुस-या सहा जणांना एका पहाडाजवळ बसवून त्‍यांच्‍यावर रॉकेट सोडण्‍यात आले. हल्‍ल्यानंतर या लोकांचे छिन्न -विछीन्न चित्र दाखवण्‍यात आले.
- ISIS च्‍या दहशतवाद्यांनी या व्‍हिडिओच्‍या चित्रीकरणासाठी मल्टी कॅमेरे वापरले आहेत.
- अपहरण केलेल्‍या सहा जणांना एका बोटमध्‍ये बसवण्‍यात आले. त्‍यानंतर काही सेकंदात बोटमध्‍ये जोरदार स्‍फोट झाला.
- इस्लामिक स्टेट समर्थकांव्‍दारे प्रसारित केलेल्‍या फोटोंवरून लक्षात येते की, लोकांच्‍या हत्‍येपुर्वी त्‍यांच्‍या मुलाखतीही घेण्‍यात आल्‍या.
बातम्या आणखी आहेत...