आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS ने सुरू केला आलिशान मॉल, सोशल मिडिया वर जारी केले PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रक्का - जगभरात ईदचा उत्साह सुरू असतानाच इस्लामिक स्टेटनेही प्रोपगंडा फोटोचा एक नवा सेट जारी केला आहे. या दहशतवादी संघटनेने हॉस्पिटल आणि फाइव्ह स्टार हॉटेलनंतर आता त्यांच्या आलिशान शॉपिंग मॉलचे फोटो जारी केले आहेत. निनेवा प्रांतातील मोसूल शहरात असलेल्या ISIS च्या या शॉपिंग मॉलमध्ये सर्व प्रकारची पाश्चिमात्य उत्पादनेही आहते. नवीन भरतीसाठी ब्रिटीश जिहादी आणि इतर देशांच्या दहशतवाद्यांना आकर्षित करण्यासाठी ISIS हा प्रयत्न करत असल्याचे मानले जात आहेत.

ब्रिटनच्या द संडे पिपल्स वृत्तपत्रातील वृत्तानुसार, ISIS च्या या मॉलमध्ये विक्रीसाठी केक चॉकलेटपासून सर्व प्रकारचे कॉस्मेटीक्सही उपलब्ध आहेत. त्याचबरोबर ते त्यांचे फाइव्ह स्टार हॉटेल्सही खास जिहादींसाठी खुले करणार असल्याचे समजते आहे. पण यामागचे सत्य असे आहे की, ISIS कडून मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी दर महिन्याला जे वेतन दिले जाते, त्यातूनच त्यांना याठिकाणी खरेदी करावी लागेल. पण ते प्रत्येकाला शक्य नाही.

ISIS च्या ताब्यात असलेल्या या भागातही जनजीवन इतर ठिकाणांप्रमाणे सुरळीत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न या फोटोंद्वारे करण्यात आला असल्याचे मानले जात आहे. ब्रिटीश मुस्लिमांनी ISIS च्या खोट्या ग्लॅमरच्या आमिशांना बळी पडू नये म्हणून ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांनी काही पावले उचलण्याची तयारी केली आहे. नेमके त्याचवेळी हे फोटो जारी करण्यात आले आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, इस्लामिक स्टेटच्या आलिशान शॉपिंग मॉलचे PHOTOS
बातम्या आणखी आहेत...