आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Isis Releases Video Of Kurdish Fighters Cage Parade For Burning

ISISने कुर्दीश तरुणांना पिंजर्‍यात कैद करुन काढली परेड, जॉर्डनच्या पायलटप्रमाणे जिवंत जाळले!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किरकुक - इस्लामिक स्टेटने इराकमधील किरकुक शहरातील कुर्दीश पशमेर्गा तरुणांना पिंजर्‍यात कैद करुन त्यांची शहरातून परेड काढली. गेल्या महिन्यात अपहरण करण्यात आलेला जॉर्डनचा पायलट अल-कसाबेह याच्या प्रमाणेच या तरुणांना जिवंत जाळल्याची शक्यता व्यक केली जात आहे.
शुक्रवारी सकाळी या घटनेचा व्हिडिओ आणि छायाचित्र अपलोड करण्यात आली. व्हिडिओमध्ये पिकअप व्हॅनच्या मागे एका पिंजर्‍यात एका तरुणाला कैद केलेले आहे. त्याच्यासोबत आयएसआयएसचा एक दहशतवादी एके- 47 घेऊन उभा. अशा कित्येक पिकअप व्हॅन शहराच्या वर्दळीच्या भागातून फिरत होत्या. त्यानंतर या तरुणांना जिवंत जाळले गेले असण्याची शक्यता आहे. एक मिनीट 17 सेकंदांचा हा व्हिडिओ आहे.
इस्लामिक स्टेट आणि कुर्दिश पशमेर्गा तरुणांमध्ये कित्येक दिवसांपासून युद्ध सुरु आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, तरुणांना कैद करुन फिरवल्याचा व्हिडिओ...