आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बगदादीनंतर आता एक शिक्षक होणार ISIS चा प्रमुख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
File Photo : अबु बक्र अल बगदादी
बगदाद - इस्लामिक स्टेट(आयएसआयएस) प्रमुख अबु बक्र अल बगदादी गंभीर जखमी झाल्याने संघटनेचे नेतृत्वाची कमान तात्पुरत्या स्वरुपात एका शिक्षकाकडे सोपवण्‍यात आली आहे. संकेतस्थळ 'न्यूजवीक'ने इराक सरकारच्या एका सल्लागाराने दिलेल्या म‍ाहितीवरुन दावा केला आहे. निनेवाह प्रांतातील अल-बाज शहरात 18 मार्च रोजी अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात बगदादी गंभीर जखमी झाले आहे. न्यूजवीकने नवे प्रमुख अबु अला अफ्री यास इस्लामिक स्टेटमधील पुढे येणारे नेतृत्व असे म्हटले आहे. इराक सरकारचे सल्लागार हिशम अल-हाशिमीने अफ्रीला जखमी आयएसआयएस खलिफा बगदादीपेक्षाही जास्त महत्त्व दिले आहे. त्याने संकेतस्थळाला सांगितले, अफ्री हे एक केवळ वक्ता नसून तो धूर्त आणि नाते जपण्‍यात निपुण आहे.
हाशिमी यांच्या मतानुसार, इस्लामिक स्टेटचे सर्व कमांडर त्याला एक उत्कृष्‍ट शासक मानतात. अफ्रीत जिहादी ज्ञानाचा खजिना आहे. तो इस्लामिक स्टेट चालवण्‍यात पूर्ण सक्षम आहे. हाश‍िमी पुढे म्हणतात, बगदादीचा मृत्यू झाल्यास अफ्रीही आयएसआयएसचा अनिश्‍चित काळासाठी खलिफा निवडून येतील. तो वायव्य इराकच्या तेल अफरमध्‍ये कधी-कधी फ‍िजिक्सचा शिक्षक होता.न्यूजवीकच्या वृत्तानुसार, 2010 मध्‍ये वरिष्‍ठ कमांडरांच्या मृत्यूनंतर अल काईदा प्रमुख ओसामा बिन लादेनने अफ्री यास दहशतवादी संघटना चालवण्‍याचा सांगितले होते.
पुढील स्लाइड्सवर नकाशाच्या माध्‍यमातून जाणून घ्‍या कुठे-कुठे आयएसआयएसची पकड...
बातम्या आणखी आहेत...