आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS ईदच्या दिवशी आणणार सुवर्ण नाणी चलनात, सोशल मीडियावर छायाचित्रे व्हायरल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेरुत - दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने सोन्याची नाणी चलनात आणली आहे. संघटनेने सोशल मीडियाच्या साइट्सवर सोन्याच्या नाण्‍यांची छायाचित्रे अपलोड केली आहे. आयएसआयएसची हे नवे चलन असल्याचे मानले जाते.नाण्‍याच्या एका बाजूने गव्हाच्या ओंब्या आणि दुस-यावर जगाचा नकाशा आहे. नाण्‍यावरील पिकाच्या माध्‍यमातून आयएसआयएसला सांगायचे, की आमच्या लोकांसाठी खाण्‍या-पिण्‍याची कमरता नाही, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. वास्तविक इराकच्या दुस-या मोठ्या मोसूल शहरात नागरिक सरकारकडे खाद्यपदार्थांची मागणी करित आहे. जून 2014 मध्‍ये आयएसआयएस दहशतवाद्यांनी मोसूलवर नियंत्रण मिळवले होते.
प्रत्येक नाण्‍याचे मूल्य एक दिनार इतके आहे. संघटनेनुसार रमजाननंतर ईदच्या दिवशी नाणी वापर करण्‍यास सुरुवात होईल. दिनार हे चलन नऊ इस्लामिक देशांमध्‍ये वापरले जाते.काही महिन्यांपूर्वीही सोशल मीडियावर इस्लामिक स्टेटच्या चलनाचे छायाचित्रे शेअर केली गेली होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सोशल मीडियावर शेअर करण्‍यात आलेल्या सोन्याच्या नाण्‍याचे छायाचित्रे...