आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मासे विकून ISIS देते दहशतवाद्यांना पगार, का आली ही परिस्थिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - आयएसआयएस इराकमध्ये मासे विक्री आणि कार डीलरशिपमधून लाखो डॉलर कमावत आहे. यातूनच ते त्यांच्या दहशतवाद्यांना पगार देत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमीतींमध्ये झालेली घट आणि तेलांचे साठे हातातून निसटल्यामुळे आयएसआयएसला मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे आता ते उत्पान्नाचे नवे स्त्रोत शोधत आहेत. या वृत्ताला इराक ज्यूडिशियल अथॉरिटिजने दुजोरा दिला आहे.

आयएसआयएसचे वार्षिक उत्पन्न होते 2.9 बिलियन डॉलर
- संरक्षण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आयएसआयएसचे वार्षिक उत्पन्न 2.9 बिलियन डॉलर पर्यंत होते.
- इराक आणि सीरियातील तेल आणि गॅस विक्रीतून त्यांना हा पैसा मिळत होता.
- अमेरिकेच्या नेतृत्वातील सेनेने आयएसआयएसच्या आर्थिक इन्फ्रास्ट्रक्चरवर ताबा मिळवला आहे.
- आर्थिक नाड्या अवळल्या गेल्याने आयएसआयएसचे तेल काढणे, रिफायनिंग आणि ट्रान्सपोर्ट हे उद्योग बंद झाले आहे.
काय म्हणतात ज्यूडिशियल ऑफिसर
- इराकच्या सेंट्रल कोर्टचे जज जब्बार आबिद अल-हुकैमींच्या नुसार, 'दोन वर्षांपूर्वी आयएसचा जो पैशांचा सोर्स होता तो आता नाही.'
- 'आयएसच्या देशातील तेल साठ्यांवर सेनेने ताबा मिळवला आहे. अशा परिस्थितीत त्यांना त्याच्या दहशतवाद्यांना तर पैस द्यावेच लागणार आहेत, आणि त्यासाठी त्यांनी आता दुसरे पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे.'
टॅक्सही वसूल करतात दहशतवादी
- मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर बगदादच्या अनेक तलावांमध्ये आयएसआयएसने मत्स्य पालनाचा व्यवसाय सुरु केला आहे. यातून त्यांना लाखो डॉलर्सचे उत्पन्न होत आहे.
- याशिवाय आयएसआयएसने शेत जमीनींवर 10% लेव्ही (कर) वसूल करण्यास सुरुवात केली आहे.
- त्यासोबतच ते कार डीलरशिप आणि इराकच्या काही कंपन्यांवर ताबा मिळवून आर्थिक गरज भागवत आहेत.
- अमेरिकेच्या आयएचएस या विश्लेषक कंपनीच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे, की आयएसआयएसच्या उत्पन्नात तीन पटीने घसरण झाली आहे.
पुढील स्लाइडमध्ये,
सोन्याचे नाणे चलनात आणण्याची होती इच्छा