आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS च्या तावडीतून पळाल्या 32 महिला आणि मुली, बनवले होते Sex Slave

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलांना अशा प्रकारे खांद्यावर बसवून महिलांना सिंजरला पोहोचवले. - Divya Marathi
महिलांना अशा प्रकारे खांद्यावर बसवून महिलांना सिंजरला पोहोचवले.
सिंजर - इराकमध्ये 34 महिला आणि मुले ISIS च्या तावडीतून पळण्यात यशस्वी झाले आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून हे सर्व ISIS च्या क्रौर्याचे बळी ठरत होते. त्यांच्या कुटुंबातील इतरांची हत्या करून या महिलांना सेक्स स्लेव्हप्रमाणे वागवले जात होते. ISIS च्या तावडीतून पळाल्यानंतर दोन दिवस सलग पायी चालून या महिला सरकारच्या नियंत्रणात असलेल्या सिंजर शहरापर्यंत पोहोचल्या होत्या. यासाठी त्यांना सामाजिक कार्यकर्ते खलील अल धाकी यांनी मदत केली. या महिलांवर एका वाहिनीने डॉक्युमेंटरी तयार केली असून ती या आठवड्यामध्ये दाखवण्यात येणार आहे.

अमानवी वागणूक
डॉक्युमेंटरीचे डायरेक्टर अॅडवर्ड वॉट्स यांनी सांगितले की, रेस्क्यू करण्यात आलेल्या महिलांपैकी बहुतांश महिला यहुदी आहेत. त्यांना अमानवी वागणूक देण्यात आली आहे. ISIS दहशतवाद्यांनी गेल्या वर्षी ऑगस्टपासून यहुदींचा हिंसाचार आणि लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी सिंजरमध्ये एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर नरसंहार करण्यात आला होता. तसेच 3000 यहुदी महिला आणि मुलांना ताब्यात घेतले होते.

सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने पळाल्या
खलीलला मिळालेल्या माहितीनुसार अपहरण करण्यात आलेल्या यहुती महिलांना ISIS च्या दहशतवाद्यांनी तुरुंगात ठेवले होते. यापैकी काहींचे बळजबरी धर्मातर करण्यात आले. त्यापैकी 80 टक्के महिलांवर बलात्कार झाले आहेत. त्यांना वाचवणारे सामाजिक कार्यकर्ते खलील यांचे नेटवर्क चांगले आहे. ते ISIS च्या ताब्यात असलेल्या परिसराच्या आसपास राहतात. त्यामुळे मुलींना कोणत्याठिकाणी ठेवले आहे, याची त्यांना माहिती मिळते. त्यांनी आतापर्यंत 500 हून अधिक महिलांची सुटका केली आहे. मात्र या दरम्यान अनेकांना प्राणही गमवावे लागले आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, ISIS च्या तावडीतून पळालेल्या महिलांचे PHOTO
बातम्या आणखी आहेत...