आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: सीरियात IS दहशतवाद्यांनी पाडले रशियाचे हेलिकॉप्टर, दोघे ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रक्का - सीरियामध्‍ये पालमायरा येथे इसिसच्‍या दहशतवाद्यांनी रविवारी रशियन सैनिकांच्‍या एका लढाऊ हेलिकॉप्‍टरला खाली पाडले. यात दोघांचा मृत्‍यू झाला. चकमक सुरू असताना या वैमानिकांचा शस्‍त्रसाठा संपल्‍याने त्‍यांना हल्‍ल्‍याचे प्रत्‍त्‍युतर देता आले नाही.
या बाबत रशियाच्‍या एका वृत्‍तसंस्‍थेने रशियन संरक्षण मंत्रालयाच्‍या हवाल्‍याने दिलेल्‍या वृत्‍तात म्‍हटले, दहशतवाद्यांनी मिसाइल डागून हा हल्‍ला केला.
सीरियाच्‍या सैनिकांनी मदतीसाठी बोलावले होते..
> या हल्‍ल्‍यात ठार झालेल्‍यांमध्‍ये याफगत खाबिबुलनी आणि येवगेनी डोलजीन या वैमानिकांचा समावेश आहे. ते दोघे i-25 एयरक्राफ्टच्‍या टेस्ट फ्लाइंगवर होते.
> याच वेळी त्‍यांना सीरियन सैनिकांकडून मदतीसाठीचा संदेश मिळाला.
> पूर्व पालमायरामध्‍ये सीरियाच्‍या सैनिकांवर आयएसने हल्‍ला केला होता.
रशियाच्‍या संरक्षण मंत्रालयाने काय म्‍हटले ?
> रशियाच्‍या संरक्षण मंत्रालयाने सांगितले, आमच्‍या वैमानिकांना मदतीचा संदेश मिळताच कॅप्टन खबीबुलिन यांनी दहशतवाद्यावर हल्‍ला करण्‍याचा निर्णय घेतला.
> मात्र, काहीच वेळात हेलिकॉप्टरमधील शस्‍त्रसाठा संपला.
> पायलेट्सने हेलिकॉप्टरला दुसऱ्या दिशेने फि‍रवले असता दहशतवाद्यांनी मिसाइल डागले.
आयएसने प्रसिद्ध केला व्‍हि‍डिओ
> आयएसने या घटनेचा एक व्‍हि‍डिओ प्रसिद्ध केला आहे.
> यात हेलिकॉप्‍टर कसे पाडले हे दिसत आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, हेलिकॉप्टर पाडल्याच्या घटनेचा लाईव्ह व्हिडिओ....आणि संबंधित फोटोज...