आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS चे शक्तीप्रदर्शन, लीबियाच्या रस्त्यांवरुन धावल्या दहशतवाद्यांच्या गाड्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: इसिसचे शक्ती प्रदर्शन.
बेनगाझी - लीबियाच्या रस्त्यांवरून इस्लामिक स्‍टेटची काळे झेंडे असलेली टोयोटा लँड क्रूझरवर दिसल्याचे एका व्हिडिओत समोर आले आहे.बेनगाझी शहरातून विना अडथळे जाणा-या प‍िक-अप ट्रक्सला पुरुष, स्त्रिया आणि मुले मानवंदना देत होते. प्रसिध्‍दीसाठी बनवण्‍यात आलेला व्हिडिओ अन्सर अल-शरीया या दहशतवादी गटाने 5 फेब्रूवारी रोजी अपलोड केला होता. या गटाचा इसिसला पाठिंबा आहे.

त्या गटाने शहराला इस्लामिक एमिरत म्हणून जुलै 2014 रोजी घोषित केले होते. नंतर नोव्‍हेंबरमध्‍ये संयुक्त राष्‍ट्राने शरीया या दहशतवादी संघटनेला काळ्या यादीत टाकले.अमेरिकेचा राजदूत ख्रिस्तोफर स्टेफन्स यांचा बेनगाझी येथे 2012 रोजी निधन झाले. त्यास या संघटनेस जबाबदार धरण्‍यात आले. या आठवड्यात इजिप्तच्या ख्रिश्‍चनांचे लीबियाच्या किनारपट्टीवर हत्या करण्‍यात आले होते.
सौजन्य : डे‍ली मेल.
पुढे पाहा, इसिसचे शक्ती प्रदर्शन