आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ISIS च्या नराधमांनी \'शोले\' स्टाइल तोडले अपहृताचे हात, मग शिर देखील छाटले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अतिशय क्रूर आणि नानाविध प्रकारे कत्तल करून जगाला दाखवणारी सर्वात क्रूर दहशतवादी संघटना ISIS ने नवा व्हिडिओ जारी केला आहे. यात 10 ते 15 वर्षे वयोगटातील दहशतवाद्यांनी क्रूरतेचा कळस गाठला आहे. या व्हिडिओमध्ये नराधमांनी एका व्यक्तीचे दोन्ही हात झाडाल बांधले. त्या व्यक्तीचे दोन्ही हात मोठ्या तलवारींनी एका झटक्यात धडापासून वेगळे केले. यानंतर दुसऱ्या एका दहशतवाद्याने धारदार खंजरने त्याचा गळा चिरून शिर धडापासून छाटले. 

 

> नेहमीप्रमाणेच, या व्हिडिओत सुद्धा आयसिसच्या कैद्याला भगव्या रंगाचे कपडे घालण्यात आले होते. दोन दहशतवाद्यांनी आधी त्या व्यक्तीचे हात धडापासून वेगळे केले. 
> रक्तबंबाळ झालेला तो पीडित तळपत होता. त्याचवेळी दुसऱ्या एका दहशतवाद्याने त्याच्या गळ्यावरून खंजर फिरवला. यानंतर त्याचे शिर छाटून आपल्या पायाखाली ठेवले. तसेच आपली संघटना किती क्रूर आहे याबाबत भाषण दिले. 
> इराक आणि सीरियात आपली जमीनी गमावलेल्या आयसिसच्या दहशतवाद्यांनी अनेक शहरांतून पळ काढला आहे. अमेरिका, रशिया, सीरिया, इराक आणि आंतरराष्ट्रीय आघाड्यांतील अनेक लष्कर या दहशतवाद्यांवर तुटून पडले आहेत. अशात हे दहशतवादी लहान मुलांचा वापर करून अशा प्रकारचा व्हिडिओ बनवताना दिसून आले.
> यापूर्वीही फेब्रुवारी महिन्यात आयसिसच्या दहशतवाद्यांनी लहान मुलांकडूनच आपल्या कैद्यांना त्यांच्या कुटुंबियांसमक्ष ठार मारले होते. व्हिडिओतील पीडित कोण आहे, किंवा हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या प्रसंगाचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...