आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहशतवादी हल्‍ल्‍यात ठार झालेल्‍या भारतीय तरुणीचा लास्ट कॉल, वाचा आपबिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तारिषी सुट्या एन्जॉय करण्यासाठी बांगलादेशात गेली होती. हा फोटो तिच्या फेसबूक अकाउंटवरून घेतला आहे. - Divya Marathi
तारिषी सुट्या एन्जॉय करण्यासाठी बांगलादेशात गेली होती. हा फोटो तिच्या फेसबूक अकाउंटवरून घेतला आहे.
ढाका- बांगलादेशची राजधानी ढाक्यातील कडेकोट सुरक्षा असलेल्या वकिलातींच्या परिसरातील हॉटेल आर्टिझन बेकरीमध्ये इसिसच्या दहशतवाद्यांनी एका भारतीय मुलीसह २० परदेशी नागरिकांची गळे चिरून हत्या केली. विशेष म्हणजे दहशतवाद्यांनी ओलिसांना कुराणातील आयती ऐकवण्याचे फर्मान सोडले. जे म्हणू शकले नाहीत त्यांचीच हत्या केली. बांगलादेशी कमांडोंनी दहशतवाद्यांना कंठस्नान घातले, तर एकाला जिवंत पकडले. १३ ओलिसांची सुखरूप सुटका केली. हा बांगलातील सर्वात भीषण दहशतवादी हल्ला होता.

शुक्रवारी रात्री ९.२० वाजेच्या सुमारास नऊ दहशतवादी ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देत गुलशन परिसरातील हॉटेल आर्टिझन बेकरीमध्ये घुसले. त्यानंतर त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यांनी २० परदेशी नागरिकांना ओलीस ठेवले होते. लष्करी अभियान महासंचालक ब्रिगेडियर जनरल नईम अशफाक चौधरी यांनी सांगितले की, सशस्त्र दलांच्या नेतृत्वात संयुक्त कारवाई सुरू होण्याच्या आधीच दहशतवाद्यांनी २० ओलिसांची निर्दयीपणे हत्या केली. हत्या झालेल्या नागरिकांचे गळे कापण्यात आले आहेत. दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या तारुशी या १८ वर्षीय भारतीय तरुणीचीही हत्या केली. या हल्ल्यात ३० जण जखमी झाले आहेत.पंतप्रधान शेख हसीना यांनी हे ओलीस नाट्य संपुष्टात आणण्यासाठी लष्कराला हस्तक्षेप करण्याचे निर्देश दिल्यानंतर ऑपरेशन थंडरबोल्ट हाती घेण्यात आले होते.

मारले गेलेले सर्व ओलीस परदेशी नागरिक होते. त्यात बहुतांश जपानी अथवा इटलीच्या नागरिकांचा समावेश आहे. शुक्रवारी रात्री गोळीबार सुरू झाल्यानंतर दोन वरिष्ठ पोलिस अधिकारी मारले गेले होते. हॉटेल आर्टिजन परिसराची झडती घेताना परदेशी नागरिकांचे मृतदेह हाती लागले आहेत.

हे ओलीस नाट्य संपुष्टात आल्यानंतर बांगलादेशी पंतप्रधान शेख हसीना यांनी बांंगलादेशातील दहशतवाद आणि हिंसक मूलतत्त्ववाद्यांचा खात्मा करण्यासाठी सर्वकाही करण्याचा संकल्प सोडला आहे. जिहादी कारवायांवर ऑनलाइन लक्ष ठेवणाऱ्या अमेरिकास्थित एसआयटीई गुप्तचर समूहाने सांगितले की, इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी गटाने हल्ल्याच्या सुमारे चार तासांनंतर आपल्या ‘अमाक’ या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून त्याची जबाबदारी स्वीकारली. नंतर त्यांनी हॉटेलमधील अनेक छायाचित्रेही जारी केली. त्या छायाचित्रांमध्ये रक्ताने माखलेले शव दिसतात. ‘इसिस कमांडों’च्या हल्ल्यात २४ लोक ठार झाल्याचा दावा ‘अमाक’ने केला आहे.

मुस्लिम बहुल बांगलादेशमध्ये संशयित दहशतवाद्यांकडून गेल्या काही दिवसांपासून धार्मिक अल्पसंख्य आणि धर्मनिरपेक्ष ब्लॉगर्सवर प्राणघातक हल्ले चढवले जात आहेत. सतखिरा जिल्ह्यात शनिवारी दहशतवाद्यांनी एका हिंदू पुजाऱ्याची हत्या केली. गेल्या दोन दिवसांत इसिसच्या दहशतवाद्यांनी एका हिंदू आणि एका बौद्ध धर्मगुरूची हत्या केली आहे.
१२ तासांचे नाट्य, १३ मिनिटांत संपले
जगातील३४ देशांच्या वकिलाती असलेल्या कडेकोट सुरक्षेच्या परिसरातील हॉटेल आर्टिझनमध्ये शुक्रवारी रात्री ९.२० वाजता सुरू झालेले हे ओलीसनाट्य १२ तास चालले. बांगलादेशच्या आर्मी पॅरा कमांडो युनिट-१ ने या मोहिमेचे नेतृत्व केले आणि १३ मिनिटांच्या आत सहा दहशतवादी मारले गेले.
बांगलादेशींवर दया, रात्रीचे जेवणही दिले
दहशतवाद्यांनी ओलिसांचा धर्म ओळखण्यासाठी त्यांना कुराणातील आयती ऐकवण्याचे फर्मान सोडले. ज्यांनी त्या म्हटल्या त्यांच्यावर दया दाखवली. ज्यांना त्या ऐकवता आल्या नाहीत त्यांचा अनन्वित छळ करून ठार मारले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हसनत करीम, त्यांची पत्नी शर्मिन १३ वर्षांची सफा वर्षीय रायनसोबत सफाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेल आर्टिझनमध्ये गेले होते. दहशतवाद्यांनी बांगलादेशींशी दुर्व्यवहार केला नाही. उलट त्यांना रात्रीचे जेवणही दिले, असे हसनतचे वडील रेझौला करीम यांनी सांगितले. या कुटुंबासह १३ ओलिसांची बांगलादेशी कमांडोंनी सुटका केली.
१००० राउंड गोळ्या, १०० स्फोट... इसिसने स्वीकारली जबाबदारी
बांगलादेशीकमांडोजनी शनिवारी सकाळी ७.४० वाजता आर्टिझनमध्ये घुसले. पहिल्या अर्ध्या तासात १००० राउंड गोळ्या चालल्या. १०० स्फोटांचे आवाजही एेकू आले. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने स्वीकारली.
हे कोणते मुसलमान?
अत्यंत भीषणकृत्य आहे. हे लोक कोणते मुसलमान आहेत? त्यांनी रमजानच्या तरावीहचा संदेश झुगारून लोकांना ठार मारले. त्यांचा कोणताच धर्म नाही. दहशतवाद हाच त्यांचा धर्म आहे. -शेख हसीना, बांगलादेशच्या पंतप्रधान
स्वराज यांचे ट्विट...
हॅलो अंकल, मी टॉयलेटमध्ये लपलेय...
परदेशात शिकणारी तारुशी जैन सुट्यांसाठी ढाक्यात गेली होती. तिच्या वडिलांचा तेथे कपड्यांचा व्यापार आहे. हल्ला झाल्यानंतर तारुशीने फिरोजाबादला तिचे काका राकेश मोहन यांना फोन केला. ‘हॅलो अंकल, मी इथे आले होते. अतिरेक्यांनी हल्ला केलाय. गोळीबार सुरू आहे. मी टॉयलेटमध्ये लपून बसले आहे...’ रात्री दीड वाजता हा शेवटचा फोन होता. यानंतर तिचा संपर्क तुटला...अतिरेक्यांनी तिलाही ठार मारले होते. ‘अतिरेक्यांनी तारुशीला ठार केले, हे सांगताना मला दु:ख होत आहे’, असे ट्विट परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, अतिरेक्यांचा अतिरेक... ISISचे थैमान... काय म्हणाल्याबांगलादेशच्या पंतप्रधान... अन् सुषमा स्वराज यांचे मन हेलावणारे ट्विट... सांगितले अतिरेक्यांनी तारुशीला ठार केले....
- आणि पाहा, घटनेशी संबंधित मन सुन्न करणारे विदारक Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...