आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS ने इमाम अलींचा मकबरा स्फोटात उडवला, ऐतिहासिक पालमीराची केली राखरांगोळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो ओळ- दहशतवाद्यांनी इमाम अलींचा मकबरा असा स्फोटात उडवला.)

बेरुत- सीरियातील पालमीरा शहराजवळच्या दोन ऐतिहासिक वास्तू ISIS च्या दहशतवाद्यांनी उडवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या वास्तू सुमारे 2000 वर्षांपूर्वीच्या होत्या.
या प्राचिन वास्तू उडवून लावल्या असल्याचे बयान ISIS ने जाहीर केले आहे. या जागा मुर्ती पुजेच्या प्रतिक झाल्या होत्या, असे सांगण्यात आले आहे. या जागा उडवल्याचे फोटोही इंटरनेटवर जाहीर करण्यात आले आहे. यातील पहिल्या फोटोत महंमद पैगंबर यांचे सहयोगी आणि चुलत बंधू इमाम अली यांच्या मकबऱ्यातून धूर निघताना दाखवले आहे. दुसऱ्या छायाचित्रात पाचशे वर्षांपूर्वीचे सूफी संत निजार अबू बहा एद्दिन यांची मजार स्फोटात उडवली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी ISIS ने पालमीरा या ऐतिहासिक शहरावर ताबा मिळवला होता. यापूर्वीही या दहशतवादी संघटनेने सीरिया आणि इराकमधील सूफी संतांच्या मजार उडवल्या आहेत. याच वर्षी मार्च महिन्यात ISIS ने तीन हजार वर्षे जुन्या असीरिया शहराला नष्ट केले होते.
35 वर्षांपूर्वी मिळाला जागतीक वारस्याचा दर्जा
पालमीरा शहर सीरियाच्या वाळवंटात अगदी मधोमध आहे. कधी काळी हे शहर समृद्ध होते. येथे खजुराची अनेक झाडे होती. यामुळेच याचे नाव पालमीरा (Palmyra) पडले होते. त्या काळी हे शहर व्यापारी घडामोडींचे केंद्र होते. पण कालांतराने या शहाराचे महत्त्व कमी झाले. शहर वाळवंटात दबले गेले. अखेर पुरातत्त्व विभागाच्या संशोधकांनी खोदकाम करीत शहर बाहेर काढले. अजूनही या शहराचे अनेक भाग वाळवंटात आहेत. 1980 मध्ये युनेस्कोने याला जागतीक वारस्याचा दर्जा दिला.
पालमीराचा इतिहास
कधी काळी राणी जेनोबियाचा हुकूम चालायचा. तिसऱ्या शतकात जेनोबिया यांनी यावर शासन केले. साम्राज्य वाढवण्यासाठी त्यांनी बराच प्रयत्न केला होता. यावेळी इजिप्तमध्ये त्यांनी अनेक रोमन अधिकाऱ्यांचा शिरच्छेद केला. जेनोबिया यांनी 271 पर्यंत इजिप्तवर शासन केले. रोमन सम्राट औरेलियन यांनी त्यांचा पराभव केला होता.
पुढील स्लाईडवर बघा, ISIS ने उद्धस्त केला इमाम अलींचा मकबरा.... असा केला स्फोट....
बातम्या आणखी आहेत...