आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS ने सीरियात कापले 8 शिया मुस्लिमांचे शीर, जाहीर केला VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हामा- इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी सीरियातील आठ शिया मुस्लिमांचे शीर कापून व्हिडिओ जाहीर केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओत काळ्या रंगाचा ड्रेस घातलेले दहशतवादी अपहृतांचे गळे चिरताना दिसून येत आहेत. यात नारंगी रंगाचे जंपसूट घातलेले शिया नागरिक दिसत आहेत. सीरियातील हामा प्रांतातील अज्ञात जागी त्यांचे गळे चिरण्यात आले आहेत.
या व्हिडिओत दिसते, की सर्व शिया नागरिकांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली असून हातही मागे बांधण्यात आले आहेत. अल्पवयीन तरुण हातात अत्याधुनिक शस्त्रे घेऊन शिया मुस्लिमांना घेऊन जाताना दिसतात. त्यानंतर हे तरुण तोंडावर काळ्या पट्ट्या बांधलेल्या दहशतवाद्यांना या शिया नागरिकांना सोपवतात. त्यानंतर एक लहान मुलगा हसत हसत या दहशतवाद्यांना धारधार सुरा देतो. यानेच सर्व शियांची गळा कापून हत्या केली जाते.
यावेळी एक दहशतवादी म्हणतो, की इस्लामिक स्टेटविरुद्ध करण्यात येणाऱ्या लष्करी कारवाईने आम्ही आणखी मजबूत होणार आहोत. आमच्या तलवारी लवकरच बशर अल असद आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या गळ्याचा घोट घेणार आहे. खुदा आमच्या सोबत आहे.
(टीप- ISIS ने जाहीर केलेला व्हिडिओ फारच हिंसक असल्याने त्याचे फोटो काढून या बातमीत देण्यात आले आहेत.)
पुढील स्लाईडवर बघा, गळा कापण्यात आलेल्या शिया मुस्लिमांची अशी काढण्यात आली होती परेड... त्यानंतर अशा प्रकारे खाली बसवण्यात आले...