आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS दहशतवाद्याचेही Linkedin अकाऊंट, स्वतःला सांगितले- प्रामाणिक, कर्तव्यदक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न (ऑस्ट्रेलिया)- न्युझिलंडच्या इस्लामिक स्टेट रिक्रूटने चक्क स्वतःचे लिंकइन अकाऊंट तयार केले आहे. या दहशतवादी संघटनेच्या ताब्यात असलेल्या सीरियाच्या रक्का शहरात तो काम करतो. एज्युकेशन मॅनेजमेंट प्रोफेशनल असा त्याने स्वतःचा उल्लेख केला आहे. विशेष म्हणजे तो प्रामाणिक, शिस्तप्रिय, मेहनती आणि कर्तव्यदक्ष असल्याचे सांगितले आहे.
या दहशतवाद्याचे मुळ नाव मार्क जॉन टेलर असे होते. तो मुळचा न्युझिलंडचा आहे. आता त्याने धर्मांतर केले असून महंमद डॅनिअल असे नाव धारण केले आहे. अनुभवांबद्दल महंमद सांगतो, की इस्लामिक स्टेटची सत्ता असलेल्या देशातील राजधानीत राहणे एक चांगला अनुभव आहे. इतर देशांमधील लोकांनी येथे येऊन अनुभव घ्यायला हवा. या भागात जिवाला जराही धोका नाही. कुटुंबासाठी ही अत्यंत सुरक्षित आणि चांगली जागा आहे. उलट पाश्चिमात्य देशांमधील लढाऊ विमाने या भागात सातत्याने बॉम्बफेक करतात. लोकांवर बॉम्ब टाकतात.
ऑक्टोबर 2014 पासून रक्काच्या शाळेतील लहान मुलांना इंग्रजी शिकवतो, असे महंमदच्या लिंकइन प्रोफाईलमध्ये सांगण्यात आले आहे. न्युझिलंडचा पासपोर्ट जाळल्याची माहिती त्याने सोशल मीडियाचा वापर करुन दिली होती. मुस्लिम लोकांनी जेहाद करावा यासाठी तो कायम आवाहन करतो. त्याचे ट्विटर अकाऊंटही आहे. या अकाऊंटचे लोकेशन बंद करण्यास विसरला असल्याने तो जेव्हा ट्विट टाकतो त्यासोबत त्याचे लोकेशनही जाहीर होते.
बातम्या आणखी आहेत...