आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ISIS Terrorist Cut Hands And Legs Of Convict In Full Public View

PHOTOS: ISIS ने सर्वांसमोर तोडले युवकाचे हात-पाय, त्यानंतर केले बॅंडेज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दहशतवादी संघटना ISIS ने काल (शुक्रवार) एका युवकाचे हात आणि पाय अगदी सर्वांसमोर तोडले. याचे फोटो जाहीर करण्यात आले आहेत. यात युवकाच्या चेहऱ्यावर कापड बांधण्यात आला आहे. काही दहशतवादी या युवकाला पकडून आहेत. एका दहशतवाद्याच्या हातात धारधार हत्यार आहे. सीरियाच्या हामा शहरात ही घटना झाल्याचे सांगितले जात आहे.
शस्त्रे लुटल्या प्रकरणी ISIS च्या न्यायालयाने युवकाला ही शिक्षा सुनावली होती. त्यानंतर दहशतवाद्यांनी या शिक्षेची अंमलबजावणी केली. त्यापूर्वी युवकाच्या हातावर हात सुन्न करणारे लिक्विड लावण्यात आले होते. युवकाला कमी वेदना व्हाव्यात यासाठी असे करण्यात आल्याचे सांगितले आहे. यावेळी शेकडो लोक उपस्थित होते. त्यांच्यासमोर हात-पाय तोडण्यात आले.
शिक्षा देण्यापूर्वी ISIS च्या कमांडरने युवकावर सिद्ध झालेले आरोप उपस्थित लोकांना वाचून सांगितले. त्यानंतर शिक्षा बजावण्यात आली. यावेळी रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या. युवकाचे हात-पाय शरीरापासून वेगळे झाले. त्यानंतर दहशतवाद्यांनी जखमेवर बॅंडेज बांधले. ISIS कडून अगदी जाहीरपणे अशी शिक्षा दिली जाते. इतरांनी अशा प्रकारचे कृत्य करु नये, यासाठी त्याचे फोटोही जाहीर केले जातात.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, ISIS कसे कापले युवकाचे हाय....