आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS ने कापले दोघांचे शिर, चीनमधील मुस्लिमांना हाती शस्त्रे घेण्याचे आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिबियाची राजधानी त्रिपोलीमध्ये इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी दोन व्यक्तींचे सर्वांसमोर शिर कापले. जादुटोण्याचा आरोप सिद्ध झाल्याने ही शिक्षा देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. सोशल मीडियावर इस्लामिक स्टेटच्या समर्थकांनी याचे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे जादुटोण्याचा आरोप सिद्ध कसा झाला हे एक कोडे आहे. दरम्यान, इस्लामिक स्टेटने मॅंडरीन भाषेत एका गाणे शेअर केले आहे. त्यात चीनमधील मुस्लिमांनी हाती शस्त्रे घ्यावीत असे आवाहन करण्यात आले आहे.
काय आहे फोटोंमध्ये
- इस्लामिक स्टेटचे तोंड झाकलेले काही दहशतवादी दोन व्यक्तींना वर्दळीच्या ठिकाणी आणतात.
- त्यांच्या डोळ्यांवर काळ्यारंगाची पट्टी लावली जाते. त्यानंतर दोघांचे हात मागे बांधले जातात.
- या दोन व्यक्तींना नारंगी रंगाचे जंपसुट घातले असतात. त्यानंतर त्यांना एका उंचवट्यावर लेटवले जाते. त्यांची मान बाहेर राहिल, अशा पद्धतीने त्यांना एका रॅमवर लेटवले जाते.
- त्यानंतर त्यांच्या मानेवर धारदार तलवारी सारख्या शस्त्राने वार केले जातात. दोघांचा लगेच मृत्यू होतो.
- हे दृष्य बघण्यासाठी मोठी गर्दी जमते. त्यात काही बालकांचाही समावेश असतो.
लिबियात गृहयुद्ध
16 मे 2014 पासून लिबियात गृहयुद्ध सुरु आहे. या देशात इस्लामिक स्टेटचे सुमारे 2000 दहशतवादी असल्याचे सांगितले जाते. लिबियाचा बराच भाग या संघटनेच्या ताब्यात आहे.
काय आहे मॅंडरीन भाषेतील गाण्यात
चीनच्या स्थानिक भाषेत असलेले हे गाणे चार मिनिटांचे आहे. यात म्हटले आहे, की आपण मुजाहिदीन आहोत. युद्धभूमिवर लढण्याचे आपले स्वप्न आहे. आपल्याला कुणीही रोखू शकत नाही. प्रतिकारासाठी हाती शस्त्रे घ्या. त्यानंतर तुमचा शत्रू घाबरेल.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी कसे कापले या दोन व्यक्तींचे शिर...
बातम्या आणखी आहेत...