आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ISIS Textbook Cover Shows Violence And Expanding Islamic State

ISISची शाळा, चिमुकल्यांना देत आहेत दहशतवाद फैलवण्‍याचे धडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून इयत्ता सातवीतील मुलांच्या भूगोलाचे मुखपृष्‍ठ. - Divya Marathi
डावीकडून इयत्ता सातवीतील मुलांच्या भूगोलाचे मुखपृष्‍ठ.
सोशल मीडियावर इस्लामिक स्टेटच्या (आयएसआयएस) शाळांमध्‍ये शिकवले जाणा-या पुस्तकांची काही मुखपृष्‍ठ समोर आली आहेत. यात भूगोलाच्या पुस्तकाच्या मुखपृष्‍ठाचाही समावेश आहे. त्यात आशिया व आफ्र‍िकेमध्ये आयएसआयएसचा प्रभाव वाढत असल्याचे दाखवले आहे. यातून समजते,की दहशतवादी कशा पध्‍दतीने मुलांची मेंदूधुळाई (ब्रेनवॉश) करत आहेत.
मध्‍यम वर्गातील विद्यार्थ्‍यांना शिकवतायत खून कसा करावा
- @Raqqa_SL नावाच्या ट्विटर खात्यावरुन पुस्तकांचे मुखपृष्‍ठ शेअर करण्‍यात आली आहे.
- मुखपृष्‍ठावरुन कळते, की मुलांना खून-हिंसक कारवायांपासून इस्लामिक स्टेटचा वाढता प्रभावाविषयी शिकवले जात आहे.
- एका मुखपृष्‍ठावर चिमुकला एके-47 हातात घेतल्याचे छायाचित्र दिसत आहे.
- तर दुस-या पृष्‍ठावर पाश्‍चात्त्य देशांची झेंडे जाळताना दाखवले आहे. यात अमेरिकेचा झेंडाही आहे.
शिकवत आहेत बॉम्ब बनवण्‍याचे
- @Raqqa_SL ने लिहिले आहे, की इस्लामिक स्टेटचे छोटीसे मुलेही कोणत्याही टाइम बॉम्बसारखीच आहेत.
- आयएसआयएसच्या नियंत्रणा खालील सीरियात लहान मुलांनाही बॉम्ब बनवण्‍याचे प्रशिक्षण दिले जाते, असे ट्विटर हँडलरने सांगितले आहे.
भारतावरही आयएसआयएसची वक्रदृष्‍टी
- 2014 मध्‍ये इस्लामिक स्टेटची घोषणा होण्‍यापूर्वी आयएसआयएसने एक नकाशा प्रसिध्‍द केला होता.
- यात आयएसआयएसने काही देश काळ रंगात दाखवले होते. पुढील पाच वर्ष त्यांचा उद्देश या भागांवर नियंत्रण मिळवणे हा आहे.
- नकाशात आफ्र‍िकेचा वरचा भाग, इस्त्रायलसह पूर्ण पाश्चिम आशिया, तुर्कस्तान, भारत, बांगलादेश आणि इंडोनेशियाचा पूर्व भाग काळ्या रंगात दाखवले होते.
पुढील स्लाइड्सवरील छायाचित्रांतून पाहा इस्लामिक स्टेटमध्‍ये शिकवले जाणा-या पुस्तकांची मुखपृष्‍ठे