बेरूत - ISIS या दहशतवादी संघटनेने: अपहरण केलेल्या ख्रिश्चन महिला बंदींचे फोटो पोस्ट केले आहेत. जर त्यांना खंडणीची रक्कम देण्यात आली नाही तर या सर्व महिलांना सेक्स स्लेव्ह बनवण्याची धमकी त्यांनी दिली आहे.
या महिलांनी फोटोत हातामध्ये एक कागद पकडलेला आहे. त्यावर या महिलांचे नाव आणि तारीख लिहिण्यात आली आहे. दोन महिलांबरोबर त्यांची मुलेही फोटोत दिसत आहेत. जर खंडणीची रक्कम दिली नाही तर दहशतवादी या महिलांना ISIS च्या फायटर्सना विकतील अशी भीती तज्ज्ञांनीही व्यक्त केली आहे.
फेब्रुवारीमध्ये केले होते अपहरण
गेल्या मंगळवारी ISIS ने अपहरण केलेल्या 220 ख्रिश्चनांपैकी 22 जणांची सुटका करण्यात आली होती. फेब्रुवारी महिन्यात ISIS ने सिरियामधून त्यांचे अपहरण केले होते. गेल्या काही कालावधीत ISIS चा ख्रिश्चन आणि यहुदींबरोबरच्या वर्तनात बराच बदल झाला आहे. आधी या समुदायांना ISIS चे वर्चस्व असलेल्या काही भागांमध्ये दहशतवाद्यांकडून मोजकी सुरक्षा मिळत होती. पण आता ISIS मुस्लीम वगळता कोणत्याही समुदायातील लोकांचा छळ आणि हत्या योग्य ठरवत आहे.
म्होरक्याही करायचा महिलांचा रेप
ISIS म्होरक्या अबू बक्र अल-बगदादीने 26 वर्षांची अमेरिकेतील बचाव पथकाची कर्मचारी कायला म्युलरला बराच काळ सेक्स स्लेव्ह बनवून ठेवले होते. तो तिच्यावर वारंवार रेप करायचा. म्युलरच्या माता पित्यांनी नुकताच याबाबत खुलासा केला आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये ISIS वर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात म्युलरचा मृत्यू झाला होता. म्युलरच्या मृत्यूची घोषणा ISIS ने केली होती. अमेरिकेने त्याला दुजोरा दिलेला नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित Photo's