आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Isis Threatens Suicide Attack On New York In Gruesome Rap Video

ISISने दिली न्यूयॉर्कमध्‍ये हल्ला घडवून आणण्‍याची धमकी, प्रसिध्‍द झाला व्हिडिओ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: ISISने प्रसिध्‍द केलेल्या व्हिडिओत दिसला जिहादी जॉन
रक्का(सीरिया)- दहशतवादी संघटना आयएसआयएसने एक नवा व्हिडिओ प्रसिध्‍द केला आहे. त्यात भयानक असे दहशतवाद्यांचे काळे कर्तृत्व दाखवली आहे. संघटनने जर्मनीसह न्यूयॉर्कचे टाइम्स स्क्वेअरवर आत्मघाती हल्ल्याची धमकी दिली आहे.व्हिडिओत एक दहशतवादी स्फोटकाने सज्ज सुसाइड बेल्टसह दिसत आहे.जो पाश्‍चात्त्य वेशभूषेत असून न्यूयॉर्कमधील वर्दळीच्या भागात स्फोट घडवून आणत आहे. हा तीन मिनिटांचा व्हिडिओ आयएसआयएसचे मीडिया नेटवर्क अल हयातने प्रसिध्‍द केला आहे.

व्हिडिओत एका ठिकाणी जर्मनी भाषेत एक व्यक्ति म्हणतो, की अल्लाच्या शत्रूंनो,कुठे आहे तुमचे सैनिक ? आता आम्ही अधिक काळ प्रतिक्षा करु शकत नाही. हे अल्ला त्यांना मारुन टाक. ही तर सुरुवात आहे. आमचे जर्मन स्लिपर सेल सुसाइड बेल्ट व हत्यारांनी सज्ज आहेत,असे तो सांगतो. व्हिडिओत अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष बराक ओबामा, पेंटॉगॉनचे पूर्व माध्‍यम सचिव अॅडमिरल जॉन कीर्बी आणि मार्टिन डेमप्सेचेही छायाचित्रे दाखवण्‍यात आले आहे.
आयएसआयएसने यावेळी पाश्‍चात्त्य नागरिक समोर ठेवून व्हिडिओ प्रसिध्‍द केला आहे.यात पश्चिमी देशातील सैनिक जखमी अवस्थेत नेताना दिसत आहे. या व्यतिरिक्त जॉर्डन पायलट मुआद अल कस्साबेहला जिवंतपणे जाळणे आणि जिहादी जॉनच्या हाताने अमेरिका आणि ब्रिटिश नागरिकांचे शिरच्छेद करतानाचे छायाचित्रांचा समावेश आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, व्हिडिओशी संबंधित फोटोज