आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ढाका हत्याकांड ही केवळ झलक, बांगलादेशसह जगभरात हल्ल्यांची ISIS ची धमकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका - जगभर शरिया कायदा लागू होत नाही तोपर्यंत बांगलादेश आणि जगभरात आणखी हल्ले केले जातील, अशी धमकी इसिस या दहशतवादी संघटनेने नव्या व्हिडिओद्वारे दिली आहे. गेल्या आठवड्यात ढाक्यात घडवलेले हत्याकांड ही फक्त ‘झलक’ होती, असा इशाराही इसिसने दिला आहे.
हा व्हिडिओ संदेश सिरियातील रक्का या इसिसचा बालेकिल्ला असलेल्या भागातून देण्यात आल्याचे दिसते. संदेश बांगला भाषेत आहे. हा व्हिडिओ आधी इसिसशी संबंधित संकेतस्थळावर आणि नंतर बुधवारी पहाटे यूट्यूबवर आढळला.

दहशतवाद्यांनी गेल्या शुक्रवारी ढाका येथील एका प्रख्यात रेस्टॉरंटमध्ये घुसून २२ जणांना ठार केले होते. त्यापैकी बहुतांश जण विदेशी नागरिक आहेत. त्यात इटली, जपान, भारत आणि अमेरिकेच्या नागरिकांचा समावेश होता. इसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर हा व्हिडिओ संदेश देण्यात आला. तो साइट (एसआयटीई) इंटेलिजन्स संकेतस्थळावर मंगळवारी प्रसारित करण्यात आला. ढाक्यात २० ओलीस आणि दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या हत्येच्या धक्क्यातून अजूनही बांगलादेशवासीय बाहेर आलेले नाहीत तोच धमकी देणारा हा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओतील व्यक्तींचा हवाला देऊन साइट इंटेलिजन्सच्या संचालक रिटा कात्झ यांनी ‘ही फक्त झलक होती.. पुनरावृत्ती करू,’ असे ट्विट केले आहे.
बांगलादेश सरकारने मात्र गेल्या शुक्रवारच्या हल्ल्यासाठी जमाअतुल मुजाहिदीन बांगलादेश ही दहशतवादी संघटना जबाबदार असल्याचा दावा केला होता.
‘शरिया कायदा लागू केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’
व्हिडिओत तीन जण दिसत असून त्यापैकी एकाचा चेहरा झाकलेला आहे, तर इतर दोघांनी दाढी वाढवलेली आहे. ते मूळचे बांगलादेशी आहेत, पण त्यांची ओळख पटलेली नाही.

पहिला दहशतवादी
जगभरात शरिया कायदा लागू केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. तोपर्यंत आम्ही हत्या करणे थांबवणार नाही. आम्ही आमच्या धर्मासाठी सुरू केलेली लढाई जिंकू किंवा मरू व शहीद होऊ.
दुसरा दहशतवादी
बांगलादेशमधील सध्याची लोकशाही म्हणजे माफ न करता येणारा गुन्हा आहे. तेथे शरिया कायदा लागू केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. जगभरात निरपराध मुस्लिमांना ठार केले जात आहे. त्यांच्या हत्येचा सूड घेत आहोत.

तिसरा दहशतवादी
बांगलादेशातील सरकारने अल्लाहचा कायदा बदलला आहे. सरकारने मनुष्यनिर्मित कायदा लागू केला आहे. त्यामुळे ते ‘काफिर’ आहे. त्याच्याविरोधात लढणे हे आमचे धार्मिक कर्तव्य आहे.

इसिसने स्वीकारली जबाबदारी
इसिसने गेल्या वर्षीच्या सप्टेंबरपासून किमान २५ हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यांमध्ये विदेशी नागरिक, हिंदू पुजारी, ख्रिश्चन, पोलिस अधिकारी, धर्मनिरपेक्ष कार्यकर्ते व ब्लॉगर्स यांना ठार केले आहे. इसिसने शिया, अहमदिया यांच्या मशिदींवर बॉम्ब आणि बंदुकीने हल्ले केले.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...