आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : दोन Gay तरुणांना ISIS ने इमारतीवरून फेकले, नंतर दगडाने ठेचले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरुणाला इमारतीवरून खाली फेकताना दहशतवादी. - Divya Marathi
तरुणाला इमारतीवरून खाली फेकताना दहशतवादी.
बेरूत - ISIS ने पुन्हा एकदा समलैंगिक असल्याच्या आरोपावरून दोन तरुणांची निर्घृण हत्या केली आहे. या दोन तरुणांना इमारतीच्या छतावरून खाली फेकण्यात आले. त्यानंतर त्यांना दगडाचे ठेचून मारण्यात आले. सिरियामधील होम्स येथे देण्यात आलेल्या या निर्घृण हत्येचे फोटो ISIS ने जारी केले आहेत.

या फोटोत बंदींच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. तसेच त्यांचे हातही बांधलेले आहेत. एका फोटोमध्ये दोन दहशतवादी या आरोपींना इमारतीवरून खाली फेकताना दिसत आहेत. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये दोन तरुणांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह दिसतात. त्या मृतदेहांच्या डोक्याजवळ दगडांचा खचही दिसून येतो.

एप्रिल महिन्यातही दहशतवाद्यांनी सिरियामध्ये दोन समलैंगिक तरुणांची दगडाने ठेचून हत्या केली होती. जून महिन्यात दहशतवाद्यांनी तीन समलैंगिक तरुणांना इमारतीच्या छतावरून खाली फेकून दिले होते. तर चार आठवड्यांपूर्वीही इराकमध्ये चार समलैंगिक तरुणांना इमारतीमधून खाली फेकले होते.

बगदादीच्या आदेशाचीही पायमल्ली
ISIS ने त्यांचा खलिफा अबू बकर अल बगदादीच्या आदेशांचीही पायमल्ली केली आहे. बगदादीने हिंसक फोटो आणि व्हिडिओ जारी न करण्याचे आदेश दिले होते. पण ISIS कडून एकापाठोपाठ एक व्हिडिओ आणि फोटो जारी करण्याचा सिलसिला सुरुच आहे. नुकताच ISIS ने एका चिमुकल्याकरवी शीर कलम केल्याचा व्हिडिओ जारी केला होता.

पुढील स्लाइड्सवर पाहा, ISIS ने दिलेल्या शिक्षेचे नवे PHOTOS