बेरूत - ISIS चा म्होरक्या अबू बकर अल बगदादीने हिंसक व्हिडिओ आणि फोटो जारी करण्यास मनाई केली आहे. तरीही संघटनेकडून वारंवार क्रूर शिक्षेचे फोटो आणि व्हिडिओ अपलोड केलेच जात आहेत. संघटनेने नुकतेच काही आरोपींचे हात कापल्याचे फोटो जारी केले आहेत.
शेकडो लोकांच्या उपस्थितीत ही शिक्षा देण्यात आली. हे फोटो कोणत्या ठिकाणचे आहेत, त्याची मात्र माहिती मिळालेली नाही. पण ISIS च्या ताब्यातील रक्का शहरातील हे फोटो असल्याचे म्हटले जात आहे. त्याशिवाय एक फ्रेंच ISIS दहशतवाद्याने सिरियाच्या एका सैनिकाला डोक्यात गोळी घालून त्याचा मृतदेह डोंगराखाली फेकण्याचा व्हिडिओही जारी केली आहे. पॅरिसच्या गल्ल्यांमध्ये जोपर्यंत मृतदेहांचा खच करत नाही, तोपर्यंत शांत राहणार नाही अशी शपथ तो घेताना व्हिडिओत दिसत आहे.
काय होता बगदादीचा आदेश?
ISIS चा प्रमुख अबू बकर अल बगदादी यांनी संघटनेच्या दहशतवाद्यांद्वारे बंधक बनवलेल्यांचे शीरच्छेद करून निर्घृण हत्या केल्याचे व्हिडिओ जारी करण्यावर बंदी लादली आहे. या हिंसक व्हिडिओमुळे मुले घाबरत असल्याचे बगदादीचे म्हणणे आहे. संघटनेचे समर्थक असलेल्या मुस्लिम आणि त्यांच्या मुलांची काळजी घेण्याचे सांगत बगदादीने त्याच्या संघटनेतील लोकांना पत्र लिहिले आहे. नुकताच ISIS ने एका चाइल्ड सोल्जरकरवी शीर कापल्याचा व्हिडिओ जारी केला होता. अशाप्रकारचा हा पहिलाच व्हिडिओ होता आणि त्यावर चांगलीच टीका झाली होती.
बगदादीला मुस्लिमांची चिंता ?
ISIS बंदींना अत्यंत क्रूर पद्धतीने मारल्याचे व्हिडिओ बनवण्यात कुप्रसिद्ध आहे. गेल्या काही दिवसांत त्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्याच मोडस ऑपरेंडीमुळे ISIS चा दहशतवादी 'जिहादी जॉन' जगभरात चर्चेत आला. सुत्रांच्या मते संघटनेच्या या वर्तनामुळे मुस्लिमांनाही त्रास होत असल्याची बगदादी यांची भावना आहे. हे व्हिडिओ पाहून मुले घाबरत असल्याचे मुस्लिमांचे म्हणणे आहे.
आदेशाने पडली फूट
ISIS च्या काही समर्थकांच्या मते, या व्हिडिओमुळे मुस्लीम आणि ISIS च्या साम्राज्याची प्रतिमा दिवसेंदिवस अधिकाधिक खराब होत चालली आहे. तर काही गटांच्या मते विरोधकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओ गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे.
खलिफा म्हणजे काय?
मुस्लीम धर्मामध्ये खलिफा ही फार मोठी पदवी समजली जाते. ISIS त्यांच्या म्होरक्यांना खलिफा म्हणत असतात. खलिफा म्हणजे ईश्वराचा दूत असा त्याचा अर्थ होता. पण असे असूनही ISIS मधील काही गट त्यांचा आदेश धुडकावत असल्याचे समोर येत आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, ISIS ने जारी केलेले नवे PHOTOS