आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ISIS Top Jihadi Commanders Wife Running Sexual Slavery Network

ISIS दहशतवाद्याच्या पत्नी इतर मुलींना बनवतात सेक्स गुलाम, मोठा खुलासा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उम्म सय्याफ ही महिला जिहादीही तयार करण्याचे कामही करते. - Divya Marathi
उम्म सय्याफ ही महिला जिहादीही तयार करण्याचे कामही करते.
रक्का - जगातील सर्वात क्रूर दहशतवादी संघटना ISIS मधील काही जिहादी महिला इतर मुलांनी सेक्स गुलाम बनवण्याचे आणि त्यांच्या भरतीशी संबंधित नेटवर्कचे काम पाहतात. अमेरिकेच्या स्पेशल फोर्सने ताब्यात घेतलेल्या एका दहशतवाद्याची पत्नी उम्म सय्याफ हिने याबाबत खुलासा केला आहे.
ISIS साठी फिमेल सेक्स नेटवर्क चालवत असल्याची कबुली तिने दिली आहे. सिरियाच्या डेर एजोर शहरातून पकडण्यात आलेली उम्म सय्याफ ISIS चा सिनियर कमांडर आणि ऑइल मिनिस्टर अबु सय्याफ याची विधवा आहे. अबु एका दहशतवादी ऑपरेशनदरम्यान मारला गेला होता. उम्मने चौकशीत अमेरिकेच्या तपास अधिकार्‍यांना दहशतवादी संघटनेची बरीच खासगी माहिती दिली आहे.

महिला नेटवर्कचे काम करायची उम्म
उम्म सय्याफने सांगितले की, दहशतवादी संघटनेमध्ये महिलांना फार मोठे पद दिले जात नाही. पण संघटनेत सिनियर कमांडर त्यांच्या पत्नींना संघटनेमध्ये ऑपरेशन राबवण्याची संधी देतात. अमेरिकेच्या लष्कराने सांगितले की, जेव्हा उम्म हिला डेर एजोरमधून अटक करण्यात आली त्यावेळी तिच्याबरोबर एक एक सेक्स गुलामही होती. चौकशीदरम्यान तिने ISIS मध्ये आईएसआईएस महिलांशी संबंधित नेटवर्क, त्यांची भरती, हेरगिरीचे ऑपरेशन, आणि सेक्स गुलाम बनवण्यासाठी महिलांवर दबाव आणत असल्याचे मान्य केले आहे. तिने अनेक जिहादींकडून वापरल्या जाणाऱ्या सांकेतिक भाषेबाबतही माहिती दिली.

मुलींनी सांगितली आपबिती
ISIS च्या तावडीतून सुटका झालेल्या अनेक महिला आणि मुलींनी आतापर्यंत त्यांच्याबरोबर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली आहे. ISIS चे दहशतवादी त्यांना केवळ सेक्स ऑब्जेक्ट समजून प्राण्यांप्रमाणे वागणूक देत असल्याचेही या महिलांनी आतापर्यंत सांगितले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTOS