आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS : छोट्या जिहादींच्या ट्रेनिंगसाठी करायला लावतात बाहुलीचे शीर धडावेगळे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - दहशतवादी संघटना ISIS लहान सदस्यांना सध्या गळा कापण्याचे ट्रेनिंग देत आहे. संघटनेचे ट्रेनर 'बिहेडिंग ट्रेनिंग'साठी सध्या या सहान मुलांना बाहुल्यांचे गले कापायला सांगत आहेत. इराकच्या यहुदी समाजातील अपहरण झालेल्यां मुलांपैकी एका 14 वर्षांच्या मुलाने हा खुलासा केला आहे.

याहया नावाच्या (नाव बदललेले) या मुलाने सांगितले की, कँपमध्ये दहशतवाद्यांनी 120 हून अधिक मुलांना बाहुल्या देऊन त्यांचा गळा कापण्यास सांगितले. ज्याला व्यवस्थित गळा कापता आला नाही, त्याला तीन ते चार वेळा पुन्हा पुन्हा हाच प्रकार करायला भाग पाडण्यात आले, असेही त्याने सांगितले. दहशतवाद्यांनी याहयाचे अपहरण करून त्याला बंदी बनवून ठेवले होते. त्यांच्या तावडीतून सुटल्यानंतर तो दोहुकमध्ये त्याच्या काकाबरोबर राहतोय. गेल्या आठवड्यात दिलेल्या मुलाखतीत त्याने हे सत्य सांगितले. याहयासह इतर मुलांना रक्का येथील 'फारुक इन्स्टीट्यूट्स फॉर कब्स' येथे नेण्यात आले. त्यांची कुर्दीश नावे बदलून अरबी नावे ठेवण्यात आली. चाकू कसा पकडायचा आणि वार कसा करायचा हे शिकवण्यात आले. त्यानंतर बाहुली देऊन तिचे शीर म्हणजे शत्रूचे शीर समजा असे त्यांना सांगण्यात आले.

गेल्यावर्षी उत्तर इराकमध्ये यहुदी गावांवर हल्ला करून दहशतवाद्यांनी शेकडो वृद्धांना ठार केले होते. त्यानंतर महिला आणि मुलींना सेक्स स्लेव्हन बनवण्यासाठी विकले. तर कमी वयाच्या यहुदी मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी सोबत नेण्यात आले. त्या सर्वांचे धर्मपरिवर्तन करून त्यांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात करण्यात आली.

दिवसांत १० तास प्रशिक्षण
याहयासह त्याच्या कुटुंबाला गेल्यावर्षी इराकच्या सुलाघमध्ये बंदी बनवण्यात आले होते. त्यांना सिरियाला नेण्यात आले. त्याठिकाणी त्याला कुटुंबापासून वेगळे करण्यात आले. याहयाने सुमारे पाच महिने प्रशिक्षण घेतले. त्याला दिवसातून 10 तास ट्रेनिंग दिली जात होती. त्याच धावणे, व्यायाम, कुराण वाचणे आणि शस्त्र चालवणे याचा समावेश होता.

एकमेकांवर व्हायचा हल्ला
त्याने सांगितले की, ट्रेनिंगदरम्यान मुलांना एकमेकांना मारावेही लागल होते. एकदा त्याला त्याच्या १० वर्षीय भावाला मारण्यास सांगण्यात आले, त्यावेळी त्याच्या भावाचा दात तुटला. माझ्याशी बळजबरी करण्यात आली, आणि मी ऐकले नाही, तर गोळी मारण्याची धमकी देण्यात येत होती.
पुढील स्लाइड्सवर पाहा, छोट्या जिहादींच्या ट्रेनिंगचे PHOTO आणि याहयाने दिलेल्या मुलाखतीचा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...