आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इसिसचा समूळ खात्मा करू : अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेची पाळेमुळे खणून अमेरिका या संघटनेचा मुळासकट खात्मा करेल. जेणेकरून त्याचा फटका देश आणि अमेरिकी कुटुंबांना बसणार नाही, असे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनी म्हटले आहे.  अमेरिकेच्या लष्कराची फेरमांडणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 
 
आम्ही लोकशाहीची सर्व शस्त्रे जतन करणार आहोत. त्यासाठी सैनिक, खलाशी, हवाई दल, नौदल व तटरक्षक दलाचे बळकटीकरण केले जाणार आहे. त्यामुळे सर्व पातळीवर देशाची सुरक्षा सर्वोच्च स्थानी राहणार आहे. सरकारने नोकरदारांसाठी कर कपातीची योजना आखली आहे. त्याचा फायदा नोकरदार कुटुंब, लघु उद्योजक, गृह उद्योगांना होणार आहे. त्याशिवाय नोकरीसाठी असलेल्या कडक नियमांना शिथिल केले जाणार आहे. 
 
त्या दिशेने ट्रम्प प्रशासन प्रयत्नशील आहे,  असे पेन्स म्हणाले. विद्यार्थ्यांना शिक्षणात अधिकाधिक सुविधा देण्यासाठी शिक्षण क्षेत्राची फेररचना केली जाणार आहे. त्यासाठी सामान्यांना अधिकाधिक पर्याय उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन पेन्स यांनी दिले.
बातम्या आणखी आहेत...