आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ISIS Vanishing Historical Places Of Syria And Iraq

ISIS मुळे सिरिया-इराकची ही ऐतिहासिक स्थळे उध्वस्त होण्याच्या मार्गावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिरियाच्या पालमिरा शहराच्या प्राचीन पालमिरा थिएटरचे फोटो घेणारे पर्यटक. - Divya Marathi
सिरियाच्या पालमिरा शहराच्या प्राचीन पालमिरा थिएटरचे फोटो घेणारे पर्यटक.
ISIS इराक आणि सिरियामध्ये लोकांपेक्षा येथील ऐतिहासिक वास्तुंचे अधिक नुकसान करत असल्याचे चित्र समोर आले आहे. दहशतवाद्यांनी याठिकाणची अनेक ऐतिहासिक शहरे उध्वस्त केली आहेत. काही दिवसांपूर्वीच सिरियाच्या 2000 वर्षे जुन्या असलेल्या पालमिरा शहरावर ताबा मिळवत दहशतवाद्यांनी याठिकाणी असलेल्या ऐतिहासिक स्थळांचे मोठे नुकसान केले. तसेच दोन दिवसांपूर्वीच मुख्य आर्कियॉलॉजिस्ट खालीद असदलाही ठार केले. असद यांनी प्राचीन रोमन काळातील या शहरात 50 हून अधिक वर्षे घातलवी होती. याठिकाणच्या बहुतांश कलाकृतींचा शोध लावण्याचे श्रेय त्यांनाच होते. सिरियाच्या बोसरा आणि अलेप्पो शहरातील अनेक वारसास्थळेही दहशतवाद्यांनी नष्ट केली आहेत.

प्राचीन सांस्कृतिक केंद्र
राजधानी दमिश्कच्या उत्तर-पूर्वेला सिरियाच्या वाळवंटामद्ये एक नखलिस्तान आहे. पालमिरामध्ये अनेक प्राचीन स्थळे आहेत. हे जगातील प्राचीन सांस्कृतिक केंद्रापैकी एक होते. पालमीराची कला आणि वास्तुशिल्पे ही पहिल्या आणि दुसऱ्या शतकातील आहेत. रोमन साम्राज्याच्या कालखंडात पहिल्या शतकाच्या मध्यामध्ये त्यांची निर्मिती झाली होती. हे सिरियातील रोमन प्रांत असल्याचे तेव्हा मानले जात होते.

इराकमध्येही विध्वंस...
जवळपास हीच स्थिती इराकमध्येही आहे. इस्लामिक स्टेटने इराकच्या दोन हजार वर्षे जुनी शहरे निमरुद आणि हतराला पूर्णपणे उध्वस्त केले. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वस्तू लुटल्यानंतर दहशतवाद्यांनी बुलडोझरद्वारे ते नष्ट केले. तसेच अनेक संग्रहालयांमध्ये तोडफोडही केली. इराकमध्ये युनूसचा मकबराही दहशतवाद्यांनी बॉम्बद्वारे उडवून दिला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, उध्वस्त होण्याच्या मागावर असेलेल्या इराकच्या ऐतिहासिक स्थळांचे काही PHOTO