आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS ने गाठला क्रौर्याचा कळस, कैद्यांच्या गळ्यांत स्फोटके लावून उडवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कैद्यांना स्फोटकांची माळ घालताना दहशतवाद. - Divya Marathi
कैद्यांना स्फोटकांची माळ घालताना दहशतवाद.
मासूल - ISIS (इस्लामिक स्‍टेट) या दहशतवादी संघटनेने क्रौर्याची सीमा ओलांडली आहे. दहशतवाद्यांनी प्रसिध्‍द केलेल्या व्हिडिओत कैद्यांचा छळ करून हत्या केली केल्याचे समोर आले आहे. हेरगिरी करणाऱ्या 16 जणांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. या सर्वांच्या गळ्यांत स्फोटके लावून त्यांना उडवून देण्यात आले. त्याचा व्हिडिओही जारी केला आहे.
तीन गटांत या सगळ्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यापैकी सात जणांना एका रांगेत बसवून त्यांच्या गळ्यात स्फोटके बांधली आणि त्यांना उडवले. इस्लामिक स्टेट समर्थकांनी सोशल मीडियावर या घटनेचे फोटोही अपलोड केले. याचा 7 मिनिटांचा व्हिडिओ इराकच्या मोसूलमध्‍ये चित्रित करण्‍यात आला.
गळ्यात स्फोटके बांधून स्फोट
नारंगी जंपसूटमध्‍ये सात कैद्यांना गुडघ्‍यावर बसवल्याचे दिसत आहे. डेलिमेलच्या वृत्तानुसार, दशतवाद्यांच्या गळ्यात प्रथम स्फोटकांची माळ लावली. नंतर ती स्फोटके उडवण्‍यात आली. इस्लामिक स्टेटचे समर्थकांनी प्रसिध्‍द केलेल्या छायाचित्रांमध्ये ते कैद्यांशी बोलत असल्याचे दिसत आहे.

पाण्‍यात बुडवून मारले
त्यानंतरच्या छायाचित्रानुसार पाच बंदी नारंगी रंगाच्या जंपसूटमध्‍ये पिंज-यात दिसत आहे. नंतर दहशतवाद्यांनी त्यांना स्विमिंग पूलमध्‍ये बुडवून मारले. इस्लामिक स्टेटची हेरगिरी केल्याचा आरोप त्या कैद्यांवर होता.
कारमध्‍ये बसून ग्रेनेडचा स्फोट
कैद्यांच्या तिसऱ्या गटाला बळजबरीने एका कारमध्ये बसवून ती कार लॉक करण्यात आली. त्यानंतर बुरखाधारी दहशतवादी हातात रॉकेट लॉन्चर घेऊन आला आणि त्याने कारला उडवते. यात उर्वरित कैदी मारले गेले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, दशतवाद्यांनी जारी केलेले PHOTOS....