आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगलादेशमध्ये इस्कॉनच्या मंदिरावर गोळीबार, बाँबहल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका - बांगलादेशातील इस्कॉन मंदिरावर गुरुवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी बाँब फेकले तसेच अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली. त्यात दोन जण जखमी झाले. एकाच आठवड्यात मंदिरावरील हल्ल्याची ही दुसरी घटना आहे.

कहारोल गावात ही घटना घडली. गावठी बाँबने हा हल्ला करण्यात आला. त्यानंतर गोळीबार झाला. त्यात दोघे जखमी झाले. पुजारी आणि साधकांना अगोदर हा आवाज फटाक्यांचा वाटला. स्थानिक शालेय समितीच्या निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे कदाचित फटाके वाजवले जात असावेत, असे त्यांना वाटले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस या संस्थेच्या वतीने दिनाजपूर भागात हे मंदिर चालवले जाते.

हल्ल्याचा उद्देश काय ?
एकाच आठवड्यात हिंदू मंदिरांवर झालेल्या हल्ल्यामुळे बांगलादेश सरकारसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इस्कॉन मंदिरावरील हल्ल्याच्या घटनेतील हल्लेखोराची आेळख, उद्देश याबद्दल तूर्त काहीही सांगता येणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

कांताजी मंदिर ५ दिवसांपूर्वी हादरले : दिनाजपूर परिसरात हिंदू समुदाय मोठ्या प्रमाणात आहे. याच भागातील प्राचीन कांताजी मंदिराला पाच दिवसांपूर्वी लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पुरातत्व तज्ज्ञांच्या मते हे मंदिर अतिशय महत्वाचे आहे. परंतु दोन राजकीय गटांमधील संघर्षातून ही घटना घडली होती, असा दावा पोलिसांनी केला आहे.
बातम्या आणखी आहेत...