आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेतील मशिदींना धमकावणारी पत्रे, नरसंहार करणार असल्याची धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजलिस - अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील अनेक मशिदींना धमकावणारी पत्रे मिळत आहेत. या पत्रांत मुस्लिमांचा नरसंहार करण्याची धमकी दिली जात असून नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्तुती केली आहे. या प्रकारामुळे मुस्लिम समुदायात संरक्षणाबाबतची चिंता वाढली आहे. कॅलिफोर्नियामधील अनेक मशिदींना या आठवड्यात अशी धमकीपत्रे पाठवण्यात आल्यानंतर अमेरिकन-इस्लामिक संबंध परिषदेने स्थानिक मशिदींच्या संरक्षणात वाढ करण्याचे आवाहन केले आहे.

इस्लामिक सेंटर ऑफ लाँग बीच आणि द इस्लामिक सेंटर ऑफ क्लॅरेमाँट तसेच सॅन जोस येथील एव्हरग्रीन इस्लामिक सेंटरला अशी धमकीपत्रे मिळाली आहेत. या पत्रांतील मजकूर हाताने लिहिलेला असून त्यात मुस्लिमांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली आहे, असे वृत्त ‘लॉस एंजलिस टाइम्स’ने दिले आहे.

‘तुमच्या हिशेबाचे दिवस आता आले आहेत. आता शहरात नवे शेरीफ आहेत- अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. ते अमेरिकेला स्वच्छ करणार असून देशाचा नावलौकिक वाढवणार आहेत. तुम्हा मुस्लिमांपासूनच ते सुरुवात करणार आहेत. हिटलरने ज्यूंबाबत जे केले तेच ट्रम्प तुमच्याशी करणार आहेत,’ असा उल्लेख पत्रात आहे.

लॉस एंजलिस येथील सीएआयआरचे कार्यकारी संचालक हुस्साम ऐलौश यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ही पत्रे जाहीर करावीत की नाही अशी आमची चर्चा सुरू होती. कारण आम्हाला भीती निर्माण करायची नव्हती. पण उत्तर कॅलिफोर्नियातही अशीच पत्रे पाठवण्यात आल्याचे कळल्यानंतर आम्ही ही माहिती पोलिसांनी देण्याचा निर्णय घेतला. अशा पत्रांमुळे मुस्लिम समुदाय दु:खी आहे.ट्रम्प यांच्या प्रचारामुळेच द्वेष भावनेला प्रोत्साहन मिळाले, ट्रम्प यांनी वांशिक विद्वेष तयार करणारे लोक तयार केले असे मी म्हणत नाही. आपण त्यासाठी जबाबदार नाही, असेही ते म्हणू शकतात. पण अमेरिकन लोकांचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची जबाबदारी आता ट्रम्प यांची आहे.

चौकशी सुरू
सॅन जोस पोलिसांचे प्रवक्ता एनरिक गार्सिआ यांनी सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. द्वेषमूलक कारवाई अशाच भावनेतून आम्ही त्याकडे पाहत आहोत.
बातम्या आणखी आहेत...