आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Islamic State Again Captured Syrian City, America Warning

सिरियातील शहरावर आयएसचा पुन्हा कब्जा, अमेरिकेचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दमास्कस - दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने उत्तर सिरियातील एका शहरावर पुन्हा कब्जा केला आहे. ब्रिटन येथील सिरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्यूमन राइट्सच्या म्हणण्यानुसार, सोमवारी कट्टरपंथीयांनी ऐन एस्सा शहर आणि आसपासच्या काही गावांवर कब्जा केला आहे. मात्र, कुर्दीश पॉपलर प्रोटेक्शनच्या(वायपीजी) प्रवक्त्याने आयएसचे हल्ले निष्फळ ठरवले जात असल्याचा दावा केला आहे.

दुसरीकडे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील फौजा आयएसविरुद्ध हल्ले तीव्र करणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, हा लढा दीर्घकालीन असून अतिरेकी संघटनेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणखी वेळ लागेल,असे ओबामा यंानी स्पष्ट केले आहे. आयएसआयएल संधीसाधू आहे. त्यंानी शहरी भागातील अनेक निष्पाप नागरिकांचे प्राण घेतले आहे. त्यांचा नायनाट करण्यासाठी वेळ लागेल. स्थानिक फौजांना अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडीकडून हवाई हल्ल्यात मदत केली जाईल,असे ओबामांनी स्पष्ट केले.

तेल, नैसर्गिक वायू प्रकल्पांना लक्ष्य करणार : अाेबामा
लष्करी कारवाईला यश मिळत आहे. मात्र, आयएसआयएलने इराकमधील रामादी आणि मध्य व दक्षिण सिरियातील काही भागावर कब्जा केल्याने सेटबॅक बसला अाहे. सद्य:स्थितीत लष्करी कारवाईवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. आयएसला पैसा पुरविणा-या तेल आणि नैसर्गिक वायू प्रकल्पांना लक्ष्य केले जाईल, असे ओबामा यांनी सांगितले. आयएसवर नियंत्रण मिळवण्यासाठी अन्य देशांसोबत माहितीचे आदानप्रदान केले जाणार आहे. आयएसच्या तंबूत विदेशी तरुणांचा ओघ कमी करण्यासाठी कायदा,सीमा सुरक्षा कडक करण्यावर भर दिला जाणार आहे. आयएसमध्ये सहभागी होऊन आलेल्या बंडखोरांचा त्या-त्या देशाला धोका आहे. या देशांने हे आव्हान असून त्यासाठी सर्वांनी एकत्रित लढा देणे आवश्यक आहे. आयएसचा जगभरातील अवैध आर्थिक स्रोत बंद केला जाईल, असे मत ओबामा यांनी व्यक्त केले.

पुढे वाचा... नायजेरियातील बॉम्बस्फोटात २० ठार