ह्युस्टन - अमेरिकेच्या भूमीवर पहिला दहशतवादी हल्ला केल्याचा दावा दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने मंगळवारी केला. अमेरिकेच्या टेक्सासमध्ये गार्लेंड येथे मोहम्मद पैगंबरांच्या कार्टून प्रदर्शनावर खलीफाच्या दोन सैनिकांनी हल्ला केल्याचा दावा संघटनेने प्रसारित केलेल्या वक्तव्यात केला आहे. रविवारी केलेल्या या हल्ल्यात दोन हल्लेखोर मारले गेले.
अमेरिकेवर आणखी हल्ले करणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे. इस्लामिक स्टेटचे इतर सदस्य यापेक्षा जास्त भयानक व व्यापक हल्ले करणार आहेत. गार्लेंड हल्ल्यातील दोन हल्लेखाेरांची नावे जाहीर झाली. अॅल्टन सिंपस.नादिर सुफी अशी त्यांची नावे आहेत.