आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीर‍ियन शहर कोबानीमध्‍ये पुन्हा ISIS दहशतादी घुसले, आत्मघातकी पट्ट्याने स्फोट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
File Photo - Divya Marathi
File Photo
बेरुत - सीर‍ियाच्या कोबानी शहरात इस्लामिक स्टेटने केलेल्या बॉम्बस्फोटात आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. अल-जझीराच्या वृत्तानुसार, तुर्कस्तान सीमेजवळ असलेल्या या शहरावर आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी पुन्हा नियंत्रण मिळवले आहे. दहशतवादी कुर्दीश आणि फ्री सीरियन आर्मीच्या गणवेषात शहरात प्रवेश केला आहे. दहशतवाद्यांनी गुरुवारी(ता.25) सकाळी तीन दिशांनी हल्ला केला. त्यांनी शहरातील प्रमुख ठिकाणांवर नियंत्रण मिळवले आहे. काही दहशतवाद्यांनी स्फोटकांचा पट्टा घालून स्वत:ला उडवून घेतले.

आमानमध्‍ये बातमीदारी करणारे अल जझीरावे वार्ताहर अल शमलेने सांगितले, की शहरात प्रवेश केल्यानंतर अनेक दहशतवाद्यांनी स्फोटकांचा पट्टा घालून स्वत:ला उडवून घेतले. यात अनेक लोकांचा मृत्यू झाला. शेकडो लोक शहर सोडून चालले आहेत. शहरात दहशतवादी आणि सरकार समर्थक हल्लेखोर यांच्या दरम्यान युध्‍द चालू आहे. कुर्दीश यजीदी पेशमर्गा समुदायातील लोकांना घरात राहण्‍याची विनंती करण्‍यात आली आहे. जानेवारीमध्‍ये कुर्दीश सेनेने कोबानीवरील इस्लामिक स्टेटचे नियंत्रण मोडून काढले होते.