आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Islamic State Flag Wave In Front Of Britain Parliament

ब्रिटनच्या संसदेसमोर फडकला आयएसचा झेंडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - आयएस या दहशतवादी संघटनेचा झेंडा घेऊन एका व्यक्तीने ब्रिटनच्या संसदेसमोर निदर्शने केली. या वेळी त्या व्यक्तीसोबत एक चिमुरडी मुलगीही होती अाणि तीसुद्धा हातात आयएसचा झेंडा धरून होती. मात्र, ब्रिटन पोलिसांनी त्याला याप्रकरणी अटक केली नाही. त्याने केलेला विरोध हा कायद्याच्या अधीन राहूनच होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी लंडनच्या महानगर पोलिसांनी एक पत्रही जारी केले आहे. ब्रिटन संसदेसमोरून जात असतानाच अधिका-यांनी त्याच्याशी संवाद साधला. मात्र, तो नियमात राहूनच वर्तणूक करत होता असे त्यांचे म्हणणे होते. पोलिसांच्या मते, एखाद्या संघटनेचा झेंडा प्रदर्शित करणे, बाळगणे हा तोपर्यंत गुन्हा ठरत नाही जोपर्यंत त्यासंबंधी काही बंदी नसते. त्यामुळे ती व्यक्ती फक्त झेंडा बाळगून होती असेही त्यांनी सांगितले. सोशल मीडियावरून या प्रकरणावर तीव्र टीका सुरू आहे.