आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमजानमध्ये दिवसा घेतले जेवण, ISIS ने दोन मुलांना चढवले सुळावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: 2014 मध्‍येही रमजान महिन्यात आयएसआयएसने रक्कात मुलांना सूळावर चढवले होते. - Divya Marathi
फाइल फोटो: 2014 मध्‍येही रमजान महिन्यात आयएसआयएसने रक्कात मुलांना सूळावर चढवले होते.
बेरुत - दहशतवादी संघटना आयएसआयएसने सीरियाच्या दोन मुलांना रमजान महिन्यात अन्न सेवन केल्याने सुळावर चढवले. सीरियातील ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्यूमन रायट्सनुसार, सीरियन शहर डेर अजोरच्या मायादीन गावातील दोन लहान मुलांना सुळावर चढवून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
रमजानच्या काळात दोन्ही मुले अन्न सेवन करत होते. तेव्हा दहशतवादी संघटनेच्या जिहादी पोलिसांनी या दोन्ही मुलांना अटक केली होती. जिहादी पोलिस मुख्‍यालयात दोघांना शिक्षा सुनावण्‍यात आली. दोन्ही मुलांना दोरीने खांबाला लटकवून मारण्‍यात आले. संध्‍याकाळपर्यंत त्यांचे मृतदेह तसेच खांबाला बांधलेल्या अवस्थेत ठेवले होते. मृतदेहांवर 'यांनी धर्माचा विचार न करता उपवास मोडला' असे लिहिलेले कागद चिटकवले होते.
रमजानमध्‍ये अन्न सेवनास बंदी
रमजानमध्‍ये संध्‍याकाळ होईपर्यंत खाणे, पिणे आणि धूम्रपान करायला बंदी आहे. इराक आणि सीरियाच्या बहुतेक भागावर नियंत्रण असलेल्या आयएसआयएसकडून शरिया कायदे न पाळणा-यांचे शिरच्छेद करणे, दगडाने मारणे, सुळीवर चढवणे आणि चाबूक मारणे अशा शिक्षा दिल्या जातात.
मात्र स्वत: करता मौज
स्वत: आयएसआयएसचे दहशतवादी स्वादीष्‍ट व्यंजनांचा आस्वाद घेताना दिसत आहेत. त्यांनी याबाबतची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, रमझानच्या काळात हे दहशतवादी छान चमचमीत पदार्थांवर ताव मारतात... दुसरीकडे येथील जनता दोन वेळच्या जेवणासाठी रांगेत राहते....