आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Islamic State Head Abu Bakr Al Baghdadi Terrorist Group Shura Council

बगदादीच्या जागी नवा नेता निवडण्याचा निर्णय,अहमद अब्दुल कादीर उत्सुक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद- अत्यंत क्रूर दहशतवादी संघटना म्हणून कुख्यात असलेल्या आयएसआयएसचा प्रमुख अबू बक्र अल-बगदादी पाठीच्या कण्याला झालेल्या कथित दुखापतीमुळे आजारी आहे. त्याच्या जागी नव्या नेत्याची निवड करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. सध्या जवळपास पंगू अवस्थेत असल्यामुळे बगदादी संघटनेवर लक्ष देऊ शकत नसल्यामुळे शुरा कौन्सिल ही सर्वोच्च संस्था बगदादीच्या जागी नव्या नेत्याची निवड करणार असल्याचे प्रसारमाध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे.
आयएसआयएसविरुद्धच्या हल्ल्यात बगदादीच्या पाठीला व डाव्या पायाला गंभीर इजा झाल्यामुळे त्याला दोन महिन्यांपूर्वीच सिरियाच्या राका शहरात हलवण्यात आल्याचे डेली बिस्टच्या वृत्तात म्हटले आहे. बगदादी संघटनेचे निर्णय घेण्यास बौद्धिकदृष्ट्या सक्षम आहे, मात्र त्याला शरीर साथ देत नाही. त्यामुळे स्वयंघोषित खलिफा राज्यात दैनंदिन निर्णय घेऊ शकणारा तसेच सिरिया आणि इराकच्या आघाडीचे नेतृत्व करू शकणाऱ्या नेत्याची निवड केली जाणार आहे. हा म्होरक्या बगदादीनंतरचा प्रमुख असेल. आयएसआयएस नेत्याच्या स्पर्धेत दोन इराकी आणि एका सिरियन अतिरेक्याचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. यातील बंडखोर गटाचे नेतृत्व अहमद अब्दुल कादीर करत आहे. त्याने "आय ऑन द होमलँड' ही मोहीम सुरू केली आहे. अब्दुल कादीरने अमेरिकास्थित वेबसाइटला आयएसचे ओळखपत्र प्रसिद्ध केले आहे. दरम्यान, अबू अल-आफ्रीची उपप्रमुखपदी निवड झाल्याचे वृत्त आहे. आयएसआयचे नऊ नेते या आठवड्यात शुरा कौन्सिलच्या बैठकीत त्याच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करतील, असे सांगण्यात येते.
नऊ डॉक्टरांकडून उपचार
शुरा कौन्सिलमध्ये इराकी दहशतवाद्यांच्या पाठीराख्यांचे प्रमाण अिधक आहे. याशिवाय अबू अली अल-अनबारी हा दुसरा इराकी या पदाच्या स्पर्धेत असल्याचे सांगण्यात येते. ब्रिटनच्या मार्चमधील वृत्तात बगदादी मार्चमधील हल्ल्यात जखमी झाल्याचे म्हटले होते. १८ मार्च रोजी करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात बगदादीचे नेमके काय झाले, याची काहीच कल्पना नसल्याचे अमेरिकी संरक्षण दलाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. बगदादीवर उपचार करण्यासाठी नऊ डॉक्टर्स राकामध्ये नेण्यात आल्याचे सांगण्यात येते.