आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Islamic State Jihadist Blows Himself Up In Southern Turkey

तुर्कीमध्ये IS चा आत्मघात हल्ला, पंतप्रधान मोदी सध्या आहेत याच देशात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छायाचित्र - पंतप्रधान मोदी ब्रिटन दौऱ्यादरम्यान एका बैठकीत - Divya Marathi
संग्रहित छायाचित्र - पंतप्रधान मोदी ब्रिटन दौऱ्यादरम्यान एका बैठकीत
अंकारा - तुर्कीमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. आता मिळालेल्या माहितीनूसार, दक्षिण तुर्कीमध्ये गाजियनतेप येथे आयएसच्या एका सुसाइड बॉम्बरने स्वतःला उडवून दिले. या हल्ल्यात चार पोलिस जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची परिस्थिती गंभीर आहे. विशेष म्हणजे, तुर्कीमध्ये जी-20 देशांची परिषद होत आहे. या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह जगातील विविध देशांचे नेते उपस्थित आहेत.
कुठे झाला हल्ला
तुर्कीमधील गैजनतेप शहरात हल्ला झाला आहे. हे ठिकाण सीरिया सीमेजवळील शहर आहे. तुर्की पोलिसांनी संशयितांच्या शोधात 10 ठिकाणी छापेमारी केली. पोलिसांसमोर येताच एका संशयिताने स्वतःला उडवून दिले. त्याची ओळख 'आयएसआयएस'चा बॉम्बर अशी करण्यात आली आहे.

मोदी आता कुठे आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनचा तीन दिवसांचा दौरा आटोपून जी-20 परिषदेसाठी तुर्कीला पोहोचले. ते तुर्कीच्या अंताल्या शहरात आहेत.

येथे क्लिक करुन जाणून घ्या, कशी आहे तुर्कीमध्ये मोदींची सुरक्षा