आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीरिया : ISIS चा कहर, पालमीरा शहरात महिला-मुलांसह 400 जणांची हत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेरुत - कुख्यात दहशतवादी संघटना आयएसआयएस (इस्लामिक स्टेट) ने सीरियाच्या पालमीरा शहरात मृत्यूचा तांडव केला. दहशतवाद्यांनी शहरातील 400 नागरिकांची हत्या केली. यात सर्वाधिक महिला आणि मुले होती. रविवारी सीरियाच्या सरकारी वृत्तवाहिनीने याची माहिती दिली. दहशतवाद्यांनी ठार केलेले लोक सीरिया सरकारबद्दल प्रामाणिक असल्याची माहिती आहे. दहशतवाद्यांनी बुधवारी या शहरावर ताबा मिळविला होता. तेव्हापासून लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चमकम सुरु आहे.
सीरियाच्या ऑब्जर्व्हर फॉर ह्यूमन राइट्स संघटनेने म्हटले आहे, की आयएसआयएसने उत्तर आणि पूर्व सीरिच्याच्या मोठ्या भागावर ताबा मिळविला आहे. एवढेच नाही तर, त्यांनी देशातील अनेक नागरिकांवर नियंत्रण मिळविले आहे.
नागरिकांचे पलायन
पालमीरा शहराची लोकसंख्या 65,000 च्या आसपास आहे. त्यातील 1,300 कुटुंबांनी जीव वाचविण्यासाठी पलायन केले आहे. होम्स प्रांताच्या राज्यपालांनी नागरिकांच्या पलायनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अशीही माहिती आहे, की दहशतवाद्यांनी पालमीरा येथील लष्करी तळ, तुरुंग आणि गुप्तचर संस्थांची मुख्यालये ताब्यात घेतली आहेत.
दोन हजार वर्षांचा इतिहास असलेले पालमीरा हे शहर राजधानी दमिश्कपासून जवळपास 215 किलोमीटर अंतरावर आहे. याचा युनेस्कोने जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश केला आहे. येथे आजही अनेक ऐतिहासिक वारसास्थळे आहेत. दहशतवाद्यांनी याआधी मार्चमध्ये इराकच्या निमरुद शहरावर ताबा मिळवून तेथील तीन हजार वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक ठेवा स्फोटकांनी नष्ट केला होता.