आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएसचा हिंसक मनसुबे भारतात तडीस नेण्याचा कट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - सिरिया, इराकमधील हिंसाचारानंतर इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने आपले हिंसक मनसुबे भारतात तडीस नेण्याचा कट रचला आहे. अमेरिकेसोबतच्या मैत्रीवरून भारताला लक्ष्य करण्यात येणार असून त्यासाठी पाकिस्तान-अफगाणिस्तान तालिबानची साथ घेतली जाणार आहे.

अमेरिकेतील यूएसए टुडेमध्ये यासंदर्भात मंगळवारी एक शोधलेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात ३२ पानांच्या उर्दू दस्तऐवजाचा हवाला देण्यात आला आहे. पाकिस्तानी नागरिकाकडून हा दस्तऐवज हस्तगत करण्यात आला असून तो पाकिस्तानी तालिबानशी निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात आले. भारत-अमेरिका यांच्यात मैत्री वाढू लागली आहे. त्याचबरोबर अमेरिकेशी असलेल्या शत्रुत्वातून हा हल्ला करण्यात येणार असल्याचे कागदपत्रांतून स्पष्ट होते. अमेरिकेने त्यांच्या सर्व सहका-यांना एकत्र आणून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास अंतिम लढाईसाठी उम्मा (मुस्लिम) एकजूट होतील, असा इशारा या कागदपत्रांतून
देण्यात आला आहे. मूळ उर्दू असलेल्या या कागदपत्रांचे स्वतंत्रपणे इंग्लिशमध्ये भाषांतर करण्यात आलेले आहे.
‘अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ द इस्लामिक स्टेट कॅलिफेट, द कॅलिफेट अॅकॉर्डिंग टू द प्रोफेट’ अशा शीर्षकाचा दस्तऐवज आहे.

प्रादेशिक शांततेला धोका
भारतात हल्ला करण्याचा आयएसचा मनसुबा म्हणजे उपखंडात अशांतता निर्माण करण्याचाच कट अाहे. तसे झाल्यास दक्षिण आशियातील दहशतवाद्यांना अंत्य भोजनासाठी वापरल्या जाणा-या ‘पवित्र पात्रा’सारखे ते वाटू लागले, असे ब्रुस रिडेल यांनी सांगितले. रिडेल हे सीआयएचे निवृत्त अधिकारी व ब्रुकिंग इन्स्टिट्यूटचे विद्यमान वरिष्ठ अधिकारी आहेत.

संघर्षाची पद्धत बदलली
अमेरिकेशी थेट संघर्ष करण्यात ऊर्जा घालवण्यापेक्षा शस्त्र वाढवण्यासाठी अरब राष्ट्रांतून मदत घेण्यावर भर द्यायला हवा. त्यातून संघटना मजबूत राहील, असे आयएसला वाटत असल्याचे पत्रातून स्पष्ट झाले आहे.

लष्कर-ए-झांगवीच्या १३ चा खात्मा
इस्लामाबाद । पाकिस्तानी पोलिसांनी लष्कर-ए-झांगवी या बंदी असलेल्या संघटनेचा म्होरक्या मलिक इश्कसह १३ जणांचा खात्मा केला. पाकिस्तानातील पंजाबमध्ये झालेल्या चकमकीत मलिक ठार झाला. अल्पसंख्याक शिया समुदायाच्या विरोधातील अनेक हल्ल्यांचा तो मास्टरमाइंड होता. चकमकीत मलिकच्या दोन मुलांचाही मृत्यू झाला. घटनेत सहा पोलिस जखमी झाले.

अल कायदाला दिले निमंत्रण
इस्लामिक स्टेटच्या भविष्यातील हिंसक मनसुबे ३२ पानी पत्रात वाचायला मिळतात. त्यात अल कायदाला आयएसमध्ये सामील होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. सर्व मुस्लिमांनी इस्लामिक स्टेटच्या नेतृत्वाखाली एकत्र आले पाहिजे. जगातील १ अब्ज मुस्लिमांनी संघटनेसोबत राहिले पाहिजे, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.