आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Islamic State Seizes Dam, Kills Iraqi General, 127 Soldiers News In Marathi

आयएसकडून 127 सैनिकांची हत्या, अनबारमध्ये धरणावर आयएसचा ताबा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद- इस्लामिक स्टेटच्या (आयएस) दहशतवाद्यांनी इराकमधील अनबार प्रांतात एका मोठ्या धरणावर ताबा मिळवला आहे. या भागातून दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी इराकी सैनिकांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका लष्करी अधिकाऱ्यासह 127 जवानांची दहशतवाद्यांनी हत्या केली.
अनबार प्रांताचे उपप्रमुख फलेह अल इस्सावी यांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी फस्ट आर्मी डिव्हीजनच्या कमांडरलाही गोळ्या घातल्या. दरम्यान, 40 इराकी सैनिकांना दहशतवाद्यांनी ओलिस ठेवले असून त्यांचीही क्रूरपणे हत्या करण्यात आली असल्याचे मानले जाते.
इराकच्या संरखण मंत्रालयातील सूत्रांनुसार, फालुजाजवळ थार्थर धरणावर पुन्हा ताबा मिळवण्यासाठी इराकी फौजांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. थार्थर हबानिया दरीखोऱ्यातील पाण्यावर हे धरण बांधण्यात आले आहे.

बगदादपासून 98 किमी अंतरावर हे धरण आहे. यावर पुन्हा ताबा मिळवणे इराकी फौजांना अद्याप यश आलेले नाही. आयएसच्या दहशतवाद्यांना सलाहुद्दीन तिकरितमधून हुसकावून लावण्यात मार्चमध्ये इराकी फौजा यशस्वी झाल्या होत्या. मात्र, सुन्नीबहुल अनबार प्रांतात मात्र अजूनही या फौजांना ताबा मिळवता आलेला नाही.

पंतप्रधानांचा दौरा
इराकचेपंतप्रधान हैदर अली अबादी यांनी एप्रिलच्या प्रारंभी अनबार प्रांताचा दौरा केला होता. या वेळी त्यांनी असा दावा केला होता की, या भागात लपलेल्या दहशतवाद्यांची पकड सैल होत चालली आहे. मात्र, प्रत्यक्षात या भागात आयएसची शक्ती वाढली असल्याचे दिसत आहे.

दहशतवाद्यांची छायाचित्रे ऑनलाइन
आयएसनेफ्रान्स, बेल्जियम आणि सेनेगलमधील तीन लोकांची छायाचित्रे ऑनलाइन प्रसिद्ध केली असून हे तिघे आयएससाठी आत्मघाती हल्ले करत असल्याचे म्हटले आहे. हे हल्ले नेमके कुठे केले जातील किंवा केले गेले याचा उल्लेख मात्र यात नाही.