आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Islamic State Will Expand To Kashmir And Kill Cow Worshipping Hindus

ISIS ची धमकी- गो-पूजकांना संपवून काश्मिरवर ताबा मिळवणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबुल - इस्लामिक स्टेटने त्यांच्या प्रोपोगंडा मॅगझिन 'दाबिक'मध्ये आयएस काश्मिरवर ताबा मिळवणार आणि गायींची पूजा करणाऱ्या हिंदूंना संपवणार असल्याचे म्हटले आहे. याआधी आयएसआयएसने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही धमकी दिली होती.

हिंदू आणि काफिर मुस्लिमांना धमकी
- दाबिकच्या 13 व्या अंकात अफगाणिस्तान-पाकिस्तान विभागाचे कमांडर हाफिज सईद खानने म्हटले आहे, 'इतिहास साक्षी आहे, की या भागात मुस्लिमांचे राज्य होते.'
- 'मात्र आता येथे गायींची पुजा करणारे हिंदू आणि नास्तिक चीनी राहात आहेत.'
- 'या हिंदूंना आणि काफिर मुस्लिमांना संपवण्यासाठी त्यासोबतच खलिफाचे शासन निर्माण करण्यासाठी आयएस तयार आहे.'
- 'अफगाणिस्तान आणि पाकिस्तान विभाग (अफ-पाक) आयएसच्या नियंत्रणात येणे गरजेचे झाले आहे. हा भाग खलिफा आणि मुस्लिमांच्या शासनाचा विस्तार करण्याचा गेट-वे आहे.'
पाकिस्तान आणि लष्करलाही धमकी
- सईदने अफ-पाकच्या पाच प्रशासकीय विभागांवर आयएसचा ताबा असल्याचा दावा केला.
- तो म्हणाला, येथे इराक आणि सिरियाप्रमाणे शरियत कायदाने चालणारे प्रशासन लागू झाले आहे.
- 'पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे सरकार, तालिबान आणि लष्कर-ए-तोएबाला इशारा देत म्हटले आहे, की खलिफा आणि जिहाद मध्ये अडवे येऊ नका.'

कोण आहे हाफिज सईद खान ?
- हाफिज सईद खानला मुल्ला सईद ओरकजई नावानेही ओळखले जाते.
- तो पहिले तहरिक-ए-तालिबान (टीटीपी) चा सदस्य होता. नंतर 'आयएसआयएस'सोबत जोडल्या गेल्या.
- आयएसने सईद खानला खुरासानाचा आमिर बनविले आहे. त्याला विभागीय कमांडरचीही जबाबदारी दिली आहे.
- खुरासाना प्रॉविन्स इराणमध्ये आहे. यावर ताबा मिळवण्याचा आयएसचा प्रयत्न राहिला आहे.
- आयएसला आता त्यांचे शासन अफगाणिस्तान पाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, भारत आणि चीनमध्ये पसरवण्याची इच्छा आहे.