दुबई - जगभरातील मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या वार्षिक हज यात्रेवर यंदा दहशतवादाचे सावट दिसून येत आहे. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या एका गटाने सौदी अरेबियापर्यंत आपली पोहोच वाढवण्यासाठी क्रूर मनसुब्यांचा कट रचला आहे. त्यामुळे सौदीच्या सुरक्षा यंत्रणेसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे.
सौदीत दहशतवादी कारवाया करण्यासाठी आयएसचा एक गट सक्रिय झाला असून त्यासाठी दहशतवाद्यांची भरती सुरू करण्यात आली आहे. सौदीने आयएसच्या विरोधात घेतलेली भूमिका दहशतवादी संघटनेला रुचलेली नाही. त्यामुळेच सौदीत घुसखोरी करून हिंसाचार करण्याचे कट रचले जात आहेत.
३० लाख भाविकांचा मेळा
यंदाच्या पवित्र हज यात्रेला २१ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. जगभरातून या यात्रेला किमान ३० लाख मुस्लिम बांधव येण्याची शक्यता आहे.