आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Islamic State's Violent Video Released, Fired On 25 Soldiers

इस्लामिक स्टेटचा नृशंस व्हिडिआे जारी, २५ सैनिकांना घातल्या गोळ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैरुत - इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या नृशंस कृत्याचा आणखी एक दाखला देणारा व्हिडिआे नुकताच व्हायरल झाला आहे. सिरियातील ऐतिहासिक शहर पालमिरामध्ये जवानांना निर्घृणपणे गोळ्या घालून ठार करण्यात आले. शनिवारी हा व्हिडिआे दहशतवाद्यांनी पोस्ट केला होता. ताडमूर तुरुंगातून ट्रकमधून जवानांना आणण्यात आले. नंतर नवीन प्रशिक्षण घेतलेल्या मुलांच्या हातून त्यांच्यावर गोळीबार केला.
शेकडो लोकांसमोर हे कृत्य करण्यात आले. हत्या नेमकी कधी करण्यात आली, हे मात्र स्पष्ट होत नाही. ब्रिटनमधील सिरियाचा अभ्यास करणा-या मानवी हक्कविषयक संस्थेने मात्र हा व्हिडिआे २७ मे रोजीचा असावा, असे म्हटले आहे. २७ मे रोजी आयएसने पालमिरा शहरावर यशस्वी चढाई केली होती. त्याच दिवशी सैनिकांची हत्या आणि व्हिडिआेचे चित्रीकरण झाले असावे, असे या संस्थेला वाटते. पालमिरा हे युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांपैकी एक आहे. २ हजार वर्षांपूर्वी रोमन साम्राज्याच्या खाणाखुणा येथे अजूनही जतन करण्यात आल्या आहेत.त्याच ठिकाणी दहशतवाद्यांनी रक्तरंजित कृत्य घडवून आणले.

पुढे वाचा... जबादानीवरील ताब्यासाठी सिरियन फौजांचे हल्ले