आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडनमध्ये इस्लामोफोबिक गुन्ह्यांच्या संख्येत वाढ; धक्कादायक माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ९/ ११ नंतर अमेरिकेसह ब्रिटनमध्ये इस्लामोफोबिक गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. लंडनमध्ये गेल्या वर्षी अशा गुन्ह्यांचे प्रमाण ७० टक्क्यांवर पोहोचल्याचा दावा स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी केला आहे.

दोन वर्षांपूर्वी तुलनेने अशा प्रकारचे गुन्हे तुरळक घडत होते. परंतु गेल्या वर्षी पुन्हा अशा प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. मुस्लिम असल्याचे समजून व्यक्तीला मारहाणीच्या घटना घडू लागल्या आहेत. लंडनसह देशभरातील अनेक दहशतवादी घटनांत आढळून आलेल्या आरोपींचा मुस्लिम समुदायाशी संबंध असल्यावरून लोकांमध्ये वेगळ्या प्रकारची भीती आहे. त्यातून अशा प्रकारचे गुन्हे घडू लागले आहेत. मेरटॉनमध्ये गेल्या १२ महिन्यांत २६३ घटना उजेडात आल्या आहेत. त्या अगाेदर २९ प्रकरणे समोर आली होती.
हेट क्राइमचा भयंकर चेहरा
विशिष्ट समुदायाविषयी निर्माण झालेल्या घृणेतून लंडन परिसरात हल्ले वाढले आहेत. धक्कादायक म्हणजे नागरिक मुस्लिम पुरुषांच्या तुलनेत महिलांना लक्ष्य करू लागले आहेत अर्थात असे हल्ले सर्वाधिक महिलांवर होऊ लागले आहेत, असे लंडनच्या हेट क्राइमसंबंधी पोलिस विभागाचे मॅक चेश्ती यांनी सांगितले. त्यावरून हेट क्राइमचा भयंकर चेहरा समोर आला आहे.
६० टक्के महिला
टेल मेझरिंग अँटी-मुस्लिम अटॅक्स (एमएएमए) संस्थेने ब्रिटनमधील इस्लामोफोबिक हल्ल्यांचा अभ्यास केला आहे. त्यावरून आतापर्यंत झालेल्या हल्ल्यांमध्ये ६० टक्के हल्ले महिलांवरील आहेत. हिजाब असलेल्या महिला रस्त्यावरून जाताना त्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याचे एमएएमएचे संचालक फियाझ मुघल यांनी सांगितले.

सामाजिक असमतोल
नकाब असलेल्या महिलांनाही हल्ल्याच्या भीषण प्रसंगातून जावे लागल्याचा दावा एमएएमए संस्थेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे एकूण प्रगत म्हटल्या जाणाऱ्या देशात अशा प्रकारचे विघातक तत्त्वे वाढू लागली आहेत. म्हणून लंडन भागात सामाजिक समतोल बिघडू लागला आहे.