आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इस्रायली सैन्याच्या हल्ल्यात इसिसचे ४ दहशतवादी ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेरुसलेम - इस्रायली सैन्य आणि इसिसचे दहशतवादी यांच्यात झालेल्या पहिल्याच चकमकीत फौजेच्या कारवाईत चार दहशतवाद्यांचा खात्मा झाला. ही घटना सिरियाच्या सीमेवर घडली.

पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सैन्य कारवाईची माहिती दिली. याच आठवड्यात ही घटना घडली. नेतान्याहू यांनी यशस्वी कारवाईबद्दल सैन्याचे अभिनंदन केले. कारवाईमुळे देशाची सीमा सुरक्षित राहू शकली, असे ते म्हणाले. परंतु पंतप्रधानांनी कारवाईची सविस्तर माहिती मात्र दिली नाही. अशा प्रकारची चकमक घडण्याची ही पहिलीच वेळ आहे. घटनास्थळाहून मोठ्या संख्येने मशीनगन, मॉर्टर इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. दुसरीकडे सिरियाच्या सीमेपलीकडून इस्त्रायल च्या दिशेने मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू होता. इस्रायल च्या हवाई दलाने चार दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कारवाईत हवाई दलही होते.
बातम्या आणखी आहेत...